कारंजालाड, जि.
अॅग्रो विशेष
उजनी धरणातून भीमेत पुन्हा विसर्ग वाढवला
सोलापूर ः उजनी धरणातून भीमा नदीत कमी करण्यात आलेला विसर्ग सोमवारी (ता. १२) एक लाख क्युसेकपर्यंत वाढविण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पंढरपुरातील पूर परिस्थिती बऱ्यापैकी ओसरत आहे. सध्या पंचनामेही सुरू आहेत. पण, आता पुन्हा विसर्ग वाढविण्यात आल्याने पूरग्रस्त भागातील लोकांनी काळजी घ्यावी, अशा प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.

उजनी आणि वीर या दोन्ही धरणांकडून भीमा आणि नीरा नद्यांत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यात चढ-उतार सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून उजनी धरणात तब्बल दोन ते अडीच लाख क्युसेकपर्यंत भीमा नदीत पाणी सोडण्यात येत होते. तसेच वीर धरणातूनही नीरेतून भीमा नदीत ८० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग होता. पण दोन दिवसांपासून त्यात कपात करण्यात आली होती. रविवारी भीमा नदीची पाणी पातळी दहा फुटाने कमी झाली होती. पण, रात्रीतून पुन्हा विसर्गात वाढ करण्यात आली.
उजनीतून ८० हजार क्युसेक इतका विसर्ग भीमेत होता, त्यात वाढ करून तो एक लाख क्युसेक करण्यात आला आहे. तर वीर धरणातून नीरा नदीत १४ हजार क्युसेकचा विसर्ग होता, तो ३२ हजार क्युसेक करण्यात आला आहे. संगम येथून भीमा नदीत तो मिसळत असल्याने पुढे पंढरपूरकडे भीमेमध्ये सव्वा लाख क्युसेक एवढा विसर्ग वाढला आहे. परिणामी, पाणी पातळी वाढणार असल्याने पुन्हा एकदा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनीतूनही दौंडकडून ७७ हजार १९३ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. उजनी धरणात सध्या १०३ टक्के इतकी पाणी पातळी आहे.
पंढरपुरात पंचनामे सुरू
पंढरपूर शहरातील व नदीकाठच्या गावांतील घरांचे पंचनामे वेगाने सुरू आहेत. ज्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते, भीमा नदीपात्रात लगतच्या अंबाबाई पटांगण, व्यास नारायण झोपडपट्टीमधील घरांत पाणी शिरल्याने घरांची पडझड व नुकसान झाले आहे. प्रशासनाने सतर्क राहून पुराचे पाणी ओसरताच तत्काळ पंचनामे सुरू केले आहेत. घरांचे पंचनामे झाल्यानंतर नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले व तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितले.
- 1 of 434
- ››