agriculture news in Marathi, water release increased from Ujani, Maharashtra | Agrowon

उजनी धरणातून भीमेत पुन्हा विसर्ग वाढवला
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

सोलापूर ः उजनी धरणातून भीमा नदीत कमी करण्यात आलेला विसर्ग सोमवारी (ता. १२) एक लाख क्युसेकपर्यंत वाढविण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पंढरपुरातील पूर परिस्थिती बऱ्यापैकी ओसरत आहे. सध्या पंचनामेही सुरू आहेत. पण, आता पुन्हा विसर्ग वाढविण्यात आल्याने पूरग्रस्त भागातील लोकांनी काळजी घ्यावी, अशा प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.   

सोलापूर ः उजनी धरणातून भीमा नदीत कमी करण्यात आलेला विसर्ग सोमवारी (ता. १२) एक लाख क्युसेकपर्यंत वाढविण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पंढरपुरातील पूर परिस्थिती बऱ्यापैकी ओसरत आहे. सध्या पंचनामेही सुरू आहेत. पण, आता पुन्हा विसर्ग वाढविण्यात आल्याने पूरग्रस्त भागातील लोकांनी काळजी घ्यावी, अशा प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.   

उजनी आणि वीर या दोन्ही धरणांकडून भीमा आणि नीरा नद्यांत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यात चढ-उतार सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून उजनी धरणात तब्बल दोन ते अडीच लाख क्युसेकपर्यंत भीमा नदीत पाणी सोडण्यात येत होते. तसेच वीर धरणातूनही नीरेतून भीमा नदीत ८० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग होता. पण दोन दिवसांपासून त्यात कपात करण्यात आली होती. रविवारी भीमा नदीची पाणी पातळी दहा फुटाने कमी झाली होती. पण, रात्रीतून पुन्हा विसर्गात वाढ करण्यात आली. 

उजनीतून ८० हजार क्युसेक इतका विसर्ग भीमेत होता, त्यात वाढ करून तो एक लाख क्युसेक करण्यात आला आहे. तर वीर धरणातून नीरा नदीत १४ हजार क्युसेकचा विसर्ग होता, तो ३२ हजार क्युसेक करण्यात आला आहे. संगम येथून भीमा नदीत तो मिसळत असल्याने पुढे पंढरपूरकडे भीमेमध्ये सव्वा लाख क्युसेक एवढा विसर्ग वाढला आहे. परिणामी, पाणी पातळी वाढणार असल्याने पुन्हा एकदा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनीतूनही दौंडकडून ७७ हजार १९३ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. उजनी धरणात सध्या १०३ टक्के इतकी पाणी पातळी आहे. 

पंढरपुरात पंचनामे सुरू
पंढरपूर शहरातील व नदीकाठच्या गावांतील घरांचे पंचनामे वेगाने सुरू आहेत. ज्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते, भीमा नदीपात्रात लगतच्या अंबाबाई पटांगण, व्यास नारायण झोपडपट्टीमधील घरांत पाणी शिरल्याने घरांची पडझड व नुकसान झाले आहे. प्रशासनाने सतर्क राहून पुराचे पाणी ओसरताच तत्काळ पंचनामे सुरू केले आहेत. घरांचे पंचनामे झाल्यानंतर नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले व तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितले.

इतर बातम्या
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...