राज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे.
अॅग्रो विशेष
नगर-नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडले...
औरंगाबाद : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडी धरणासाठी 8.99 टीएमसी पाणी सोडन्याचे आदेश दिले होते. दरम्यान, प्रकरण न्यायालयात गेले आणि पाणी सोडणे लांबले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पाणी सोडण्याचा मार्ग सुकर करताच गुरुवारी (ता. एक) सकाळी दहा वाजेच्या सुमारास नगर व नंतर नाशिक येथील धरणातुन पाणी सोडले आहे. उशिरा का होईना मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले आहे.
औरंगाबाद : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडी धरणासाठी 8.99 टीएमसी पाणी सोडन्याचे आदेश दिले होते. दरम्यान, प्रकरण न्यायालयात गेले आणि पाणी सोडणे लांबले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पाणी सोडण्याचा मार्ग सुकर करताच गुरुवारी (ता. एक) सकाळी दहा वाजेच्या सुमारास नगर व नंतर नाशिक येथील धरणातुन पाणी सोडले आहे. उशिरा का होईना मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले आहे.
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी नियमानुसार 15 ऑक्टोबरला सुटायला हवे होते; मात्र ऊर्ध्व भागातील धरणक्षेत्रातील राज्यकर्त्यांनी त्यास विरोध दर्शविला. त्यामुळेच 16 ऑक्टोबरला गोदावरी पाटबंधारे विभागात जलसंपदा विभागाची नगर, नाशिक येथील कार्यकारी अभियंत्यांसोबत बैठक झाली. त्यामध्ये जायकवाडीत 65 टक्क्यांपेक्षा कमी पाणी असल्याच्या सूत्रानुसार 172 दलघमीची तूट भरून काढण्यासाठी ऊर्ध्व भागातील प्रकल्पांतून पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ठरले होते.
गंगापूर (नाशिक) धरणातून पाणी सोडले.. video
यानंतर नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील राज्यकर्त्यांनी पुन्हा विरोध दर्शवीत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. दरम्यान, 22 रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी गोदावरी पाटबंधारे विभागाला जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार 23 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास गोदावरी पाटबंधारेचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी 8.99 टीएमसी पाणी सोडण्याबाबतचे नाशिक येथील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांना आदेश दिले होते. मात्र, काही मंडळी न्यायालयात गेल्याने पाणी सोडण्यास विलंब झाला.
आता न्यायालयाने बुधवारी (ता.३१) संबंधित याचिकाच फेटाळून लावल्याने जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर जलसंपदा विभागाने रात्रीतुन तयारी करीत नगर जिल्ह्यातील मुळा व प्रवरा धरण समूहातुन तर नाशिक जिल्ह्यातील गंगापुर धरणांमधून गुरुवारी पाणी सोडन्यात आले आहे.
असे सुटतेय पाणी (आकडे टीएमसीमध्ये)
- मुळा (मांडओहोळ, मुळा) ः 1.90
- प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) ः 3.85
- गंगापूर (गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी) ः 0.60
- गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) ः 2.04
- पालखेड (करंजवण, वाघाड, पुणेगाव, ओझरखेड, पालखेड, तीसगाव) ः 0.60
असे आहे धरणांचे अंतर
- गोदावरी दारणा धरणसमूह : नांदूर मधमेश्वर- प्रवरासंगम (अंतर 144)
- मुळा धरणसमूह : प्रवरा संगम (अंतर 52)
- गंगापूर धरणसमूह : नांदूर मधमेश्वर- प्रवरासंगम (अंतर 154)
- पालखेड धरणसमूह : नांदूर मधमेश्वर- प्रवरासंगम (अंतर 130)
- प्रवरा धरणसमूह- भंडारदरा, निळवंडे, ओझर- प्रवरासंगम (अंतर 175)
- 1 of 432
- ››