जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग

जायकवाडी विसर्ग
जायकवाडी विसर्ग

जायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून सोमवारी (ता. १६) सकाळी १६ दरवाजे उघडून गोदावरीच्या नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला होता. तो दुपारी बारा वाजताच्या सुमारास ८ दरवाजांतून सुरू होता. प्राप्त माहितीनुसार सोमवारी (ता. १६) सकाळी ९:४५ ते १०:०० वाजता गेट्स क्र. १६, २१, १०, २७ हे अर्धा फूट उंची कमी करून एकूण २०९६ क्युसेक विसर्ग कमी करून ८३८४ विसर्ग गोदावरीपात्रात सोडण्यात आला होता. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास सोळा दरवाजे उघडून त्यामधून एकूण ८३८४ क्युसेक व जलविद्युत केंद्रामधून १५८९ क्युसेक असा एकूण ९९७३ क्युसेक इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू होता. दुपारी बारा वाजताच्या सुमारास धरणाचा पाणी टक्का ९९.७८ इतका स्थिर ठेवत येणारे पाणी जायकवाडीच्या आठ दरवाजांतून गोदावरीच्या पात्रात ७८७७ क्युसेकने पाणी सोडणे सुरू होते. त्याच वेळी डाव्या कालव्यातून १२०० क्युसेकने, तर उजव्या कालव्यातून ७०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्याच वेळी जायकवाडीत ९४३२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. 

जायकवाडी धरणातून सुरू असलेला विसर्ग... पहा Video

मराठवाड्याच्या बहुतांश भागासाठी महत्त्वाचे असलेले जायकवाडी धरण तुडुंब झाल्यात जमा आहे. रविवारी (ता. १५) सकाळी १० वाजता जायकवाडी ९९.२८ टक्क्यांवर पोचले होते. मध्यंतरी जायकवाडी धरणात थांबलेली पाण्याची आवक ६ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाली. ती सातत्याने वाढत गेली. रविवारी सकाळी ६ वाजता जायकवाडी धरणात २०२५८ क्युसेक ने पाण्याची आवक सुरू होती. सकाळी १० वाजता ही आवक २० हजार २०० क्युसेकने सुरू होती. सकाळी १० वाजता जायकवाडीमधील एकूण पाणीसाठा २८९३.५१८ दलघमीवर पोचला होता. तर धरणातील जिवंत पाणीसाठा : २१५५.४१२ दलघमीवर पोचला होता.  धरणाचा टक्का ९९.२८ वर पोचला होता. सकाळी ६ वाजेपासून धरणाच्या उजव्या कालव्यातून ७०० क्युसेक, डावा कालव्यातून ४०० क्युसेक्स तर पैठण जलविद्युत केंद्रातून १५८९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणातून सुरू होता, अशी माहिती कडा विभागाच्या नियंत्रण कक्षाने दिली. दुपारी ३ वाजताच्या सुमारास जायकवाडीत ९ हजार क्युसेक ने आवक सुरू होती. तर रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास चार दरवाजांतून जवळपास दोन हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. सोमवारी दुपारी जायकवाडीतील एकूण पाणीसाठा २९०४.२६५ दलघमी, तर जिवंत पाणीसाठा २१६६.१५९ दलघमीवर पोचला होता, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com