agriculture news in Marathi, Water release from jayakwadi, Maharashtra | Agrowon

जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

जायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून सोमवारी (ता. १६) सकाळी १६ दरवाजे उघडून गोदावरीच्या नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला होता. तो दुपारी बारा वाजताच्या सुमारास ८ दरवाजांतून सुरू होता.

प्राप्त माहितीनुसार सोमवारी (ता. १६) सकाळी ९:४५ ते १०:०० वाजता गेट्स क्र. १६, २१, १०, २७ हे अर्धा फूट उंची कमी करून एकूण २०९६ क्युसेक विसर्ग कमी करून ८३८४ विसर्ग गोदावरीपात्रात सोडण्यात आला होता. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास सोळा दरवाजे उघडून त्यामधून एकूण ८३८४ क्युसेक व जलविद्युत केंद्रामधून १५८९ क्युसेक असा एकूण ९९७३ क्युसेक इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू होता.

जायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून सोमवारी (ता. १६) सकाळी १६ दरवाजे उघडून गोदावरीच्या नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला होता. तो दुपारी बारा वाजताच्या सुमारास ८ दरवाजांतून सुरू होता.

प्राप्त माहितीनुसार सोमवारी (ता. १६) सकाळी ९:४५ ते १०:०० वाजता गेट्स क्र. १६, २१, १०, २७ हे अर्धा फूट उंची कमी करून एकूण २०९६ क्युसेक विसर्ग कमी करून ८३८४ विसर्ग गोदावरीपात्रात सोडण्यात आला होता. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास सोळा दरवाजे उघडून त्यामधून एकूण ८३८४ क्युसेक व जलविद्युत केंद्रामधून १५८९ क्युसेक असा एकूण ९९७३ क्युसेक इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू होता.

दुपारी बारा वाजताच्या सुमारास धरणाचा पाणी टक्का ९९.७८ इतका स्थिर ठेवत येणारे पाणी जायकवाडीच्या आठ दरवाजांतून गोदावरीच्या पात्रात ७८७७ क्युसेकने पाणी सोडणे सुरू होते. त्याच वेळी डाव्या कालव्यातून १२०० क्युसेकने, तर उजव्या कालव्यातून ७०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्याच वेळी जायकवाडीत ९४३२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. 

जायकवाडी धरणातून सुरू असलेला विसर्ग... पहा Video

मराठवाड्याच्या बहुतांश भागासाठी महत्त्वाचे असलेले जायकवाडी धरण तुडुंब झाल्यात जमा आहे. रविवारी (ता. १५) सकाळी १० वाजता जायकवाडी ९९.२८ टक्क्यांवर पोचले होते. मध्यंतरी जायकवाडी धरणात थांबलेली पाण्याची आवक ६ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाली. ती सातत्याने वाढत गेली. रविवारी सकाळी ६ वाजता जायकवाडी धरणात २०२५८ क्युसेक ने पाण्याची आवक सुरू होती. सकाळी १० वाजता ही आवक २० हजार २०० क्युसेकने सुरू होती. सकाळी १० वाजता जायकवाडीमधील एकूण पाणीसाठा २८९३.५१८ दलघमीवर पोचला होता. तर धरणातील जिवंत पाणीसाठा : २१५५.४१२ दलघमीवर पोचला होता. 

धरणाचा टक्का ९९.२८ वर पोचला होता. सकाळी ६ वाजेपासून धरणाच्या उजव्या कालव्यातून ७०० क्युसेक, डावा कालव्यातून ४०० क्युसेक्स तर पैठण जलविद्युत केंद्रातून १५८९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणातून सुरू होता, अशी माहिती कडा विभागाच्या नियंत्रण कक्षाने दिली. दुपारी ३ वाजताच्या सुमारास जायकवाडीत ९ हजार क्युसेक ने आवक सुरू होती. तर रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास चार दरवाजांतून जवळपास दोन हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. सोमवारी दुपारी जायकवाडीतील एकूण पाणीसाठा २९०४.२६५ दलघमी, तर जिवंत पाणीसाठा २१६६.१५९ दलघमीवर पोचला होता, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.


इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७...औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा...
मुगाचे अर्धेअधिक क्षेत्र रोगाच्या...अकोला : यंदाच्या खरिपात मुगाच्या पिकावर लिफ...
दादाजींचे कुटुंबीय जगतेय केवळ...चंद्रपूर: ‘एचएमटी’सह तब्बल ९ धानाचे वाण विकसित...
सियावर रामचंद्र की जय ! अयोध्येत रंगला...अयोध्या : राम नामाच्या भक्तिसागरात आकंठ बुडालेली...
पालघरमध्ये महावृष्टी; मुंबई, कोकणला...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ...
राज्यात ९ ऑगस्टला रानभाज्या महोत्सवमुंबई : औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची विक्री...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
अमृत आहार योजनेंतर्गत मोफत दूध भुकटी...मुंबई : राज्यातील दूध दराच्या प्रश्नावर...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...