जायकवाडीच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून विसर्ग सुरू

जायकवाडी विसर्ग
जायकवाडी विसर्ग

पैठण, जि. औरंगाबाद : जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ करत रविवारी (ता. ११) प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाशिक, नगर जिल्ह्यांतील प्रकल्पांमधून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. नाशिकबरोबरच आता नगर भागातील प्रकल्पांमधून जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने जायकवाडीत प्रत्यक्ष येणाऱ्या पाऊस पाण्याच्या आवकेतही वाढ झाली आहे. रविवारी रात्री ९ वाजता जायकवाडी प्रकल्पात ७२ हजार ६८ हजार क्युसेकने सुरू असलेला पाण्याचा येवा सकाळी सात वाजता ७३ हजार ७८९ क्युसेकवर नऊ वाजता ६३३१६ क्युसेकवर तर दुपारी दोन वाजता ६३ हजार ६५ क्युसेकवर, तर रात्री ९ वा ६३ हजार २६५ क्युसेक वर पोचला होता.  नागमठाणमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गासोबतच भंडारदरा, निळवंडे, ओझर वेअर, आदी धरणांमधून होणार्‍या पाण्याच्या विसर्गाचाही आता आवकेवर परिणाम दिसतो आहे. १२ ते १५ प्रकल्पांतील कमी अधिक विसर्गामुळे मध्यंतरी जायकवाडीच्या प्रकल्पात घटलेली आवक पुन्हा वाढते आहे. जलसंपदा विभागाच्या सूत्रानुसार रविवारी रात्री ९ वाजता जायकवाडी प्रकल्पातील एकूण पाणीसाठा २५६१ .१२१ दलघमीवर (८९ टीएमसी नजीक) पोचला होता. तर जिवंत पाणीसाठा १८२३.०१५ दलघमी इतका झाला होता. जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा ८३.९७ टक्‍क्‍यांच्या पुढे गेल्यानंतर तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व तहसीलदार (पैठण) महेश सावंत यांनी जायकवाडी प्रकल्पातून आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यासाठी रविवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास दीड हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.  पाण्याचा विसर्ग होणार असल्याने सतर्क राहण्याचे व नदीपात्रात न जाण्याचे सूचित केले होते. सोबतच जलसंपदा विभागाकडून प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून सुरू असलेला ६०० क्युसेकपर्यंतचा विसर्ग ८०० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला होता. याशिवाय प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून ४०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. सकाळी साडेअकराला आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यांच्या दिशेने सोडले जाणारे पाणी दुपारी तीनपर्यंत सुटले नव्हते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com