agriculture news in marathi, water release through five dams, satara, maharashtra | Agrowon

कोयनेसह पाच धरणांतून विसर्ग

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

सातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत जोरदार पावसाने हजेरी लावली. परिणामी प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढत असल्याने कोयनेसह पाच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची आवक वाढली आहे. हा पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरण व्यवस्थापनाकडून रविवारपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धोम-बलकवडी धरणाचा अपवाद वगळता इतर पाच प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू आहे. यामध्ये कोयना धरणातून सर्वाधिक विसर्ग सुरू आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना येथे ८४, नवजा येथे ७०, महाबळेश्वर येथे २३, वळवण येथे २५ मिमी पाऊस झाला. सध्या कोयना धरणात प्रतिसेंकद ८६६४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. चार दरवाजे एक फुटाने उचलून ८४६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात आहे. कोयना धरणात एकूण १०५.०३ टीएमसी म्हणजेच ९९.७९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच धोम धरणातून १९२, उरमोडी धरणातून ४५०, कण्हेर धरणातून ११५१, तारळी धरणातून १०७० क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे कोयना, उरमोडी, कृष्णा, तारळी या नदयांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...