agriculture news in marathi, water release from ujani dam, solapur, maharashtra | Agrowon

उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार क्‍युसेक विसर्ग

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ झाली असून, शनिवारी (ता.१९) पुन्हा उजनी धरणातून भीमा नदीत ३० हजार क्‍युसेक इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. पावसाची स्थिती अशीच राहिली, तर विसर्ग आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ झाली असून, शनिवारी (ता.१९) पुन्हा उजनी धरणातून भीमा नदीत ३० हजार क्‍युसेक इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. पावसाची स्थिती अशीच राहिली, तर विसर्ग आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

गेल्या पंधरवड्यापासून पावसाच्या विश्रांतीमुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग काहीसा कमी झाला होता. पण गेल्या दोन दिवसांत पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यातही उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ झाली आहे. दौंडकडून शनिवारी उजनी धरणात अखंड विसर्ग सुरू असल्याने सकाळी धरणातून साडेसात हजार आणि नंतर १५ हजार क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. दुपारनंतर हाच विसर्ग ३० हजार क्‍युसेकवर नेण्यात आला. पावसाची परिस्थिती अशीच राहिली, तर हा विसर्ग ४० ते ५० हजार क्‍युसेकपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरणात सध्या १११.२८ टक्के पाणीसाठा झाला आहे.


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...