दरसवाडी धरणांतून सोडलेले पाणी पोचले येवल्यात 

दरसवाडी धरणांतून सोडलेले पाणी पोचले येवल्यात 
दरसवाडी धरणांतून सोडलेले पाणी पोचले येवल्यात 

नाशिक : येवला तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव-दरसवाडी पोचले आहे. कालवा निर्मितीनंतर प्रथमच आवर्तन सोडण्यात आले. गुरुवारी (ता. २६) पहाटे ४ वाजता कातरणी शिवारात पाणी पोचताच शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला, तर ग्रामस्थांनी जलपूजन केले. त्यामुळे शेतकरी पाण्याची वाट पाहत होते, त्यांना मोठा आधार या निमित्ताने मिळाला आहे. 

दरसवाडी धरणातून आवर्तन आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तीस किलोमीटरचे अंतर पार करीत चांदवड तालुक्यातील तळेगावरोही शिवारातून येवला तालुक्याच्या कातरणी परिसरात सोडण्यात आले. गेली ४६ वर्षे उराशी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले अन् गावातून वाहणाऱ्या कालव्याला पाणी आले आहे. १९७२ च्या दुष्काळात दरसवाडी ते डोंगरगाव पोच कालव्याचे काम सध्या बाळापूरपर्यंत पूर्ण झाले आहे.

येवल्यात कालव्याच्या माध्यमातून पाणी आणण्यासाठी मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून पुणेगाव धरण व तेथून दरसवाडी धरणात पडल्याने हे दोन धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. मांजरापाडा परिसरात पाऊस असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू होता. दरसवाडी ते डोंगरगाव कालवा (बाळापूरपर्यंत) कालवा प्रवाहित झाला असून, मागील गुरुवारी (ता. २१) सोडलेले पाणी येवला हद्दीत येण्याची रात्रंदिवस प्रतीक्षा लागून होती. 

प्रथमच कालवा प्रवाहित होत असल्याने आणि कामातही सूत्रबद्धता नसल्याने अनेक ठिकाणी चढ-उतार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह शेतकरी येथे तळ ठोकून मशिनच्या माध्यमातून कालवा उकरून प्रवाहित करत आहे. यामुळे काजीसांगवी, विटावे, तळेगाव या भागांत कालव्यात चढ लागल्याने मोठ्या मेहनतीने आणि पुढे काढावे लागले. 

अखेर हे पाणी गुरुवारी (ता. २६) कातरणीच्या शिवारात आले आहे. येवल्यात पाणी आल्याने स्वप्नपूर्तीचा अवर्णनीय असा आनंद येथील शेतकऱ्यांनी फटाके फोडून, गुलालाची उधळण करून, जलपूजन करून आणि डीजेच्या तालावर नाचून व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com