agriculture news in Marathi, Water released from the lower dhoonana dam in the river bed | Agrowon

निम्न दुधना धरणातून नदीपात्रात सोडले पाणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 जून 2019

सेलू, जि. परभणी ः ब्रह्मवाकडी (ता. सेलू) येथील निम्न दुधना प्रकल्पाच्या धरणातून शनिवारी (ता. १) सायंकाळी पाचच्या सुमारास नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. एकूण १५.४८ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. धरणातून पाणी सोडण्यास विरोध होत असल्यामुळे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

सेलू, जि. परभणी ः ब्रह्मवाकडी (ता. सेलू) येथील निम्न दुधना प्रकल्पाच्या धरणातून शनिवारी (ता. १) सायंकाळी पाचच्या सुमारास नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. एकूण १५.४८ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. धरणातून पाणी सोडण्यास विरोध होत असल्यामुळे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

परभणी जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाने पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर शनिवारी (ता. १) सायंकाळी पाचच्या सुमारास निम्न दुधना धरणाच्या एक आणि दोन क्रमांकाच्या दरवाजांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच जनतेचा या धरणातून पाणी सोडण्यास विरोध आहे.

परंतु परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवत, जिंतूर, परभणी या तालुक्यांतील गावांतील नागरिकांना, जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. दरम्यान, नदीपात्रात झालेल्या प्रचंड वाळू उत्खननामुळे मोठमोठे खड्डे पडल्याने रहाटी (ता. परभणी) येथील बंधाऱ्यापर्यंत पाणी पोचण्यास नेमका किती वेळ लागेल हे निश्चित सांगता येत नाही.धरणातून एकूण १५.४८ दलघमी एवढे पाणी सोडल्यानंतर धरणाच्या जलाशयामध्ये एकूण ५६.२२० दलमघी एवढा पाणी मृतसाठा शिल्लक राहील. जलाशयातील पाण्यावर परतूर, मंठा, सेलू या शहरांसह आठ गावे पाणीपुरवठा व बुडीत क्षेत्रातील बहुतांश गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. 

नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे सेलू, मानवत, परभणी तालुक्यांतील नदीकाठच्या पिंपरी, खुपसा, मोरेगाव, खेर्डा, राजा, राजावाडी, रोहिणा,सोन्ना, गोगलगाव, सावंगी, इरळद, मंगरूळ, टाकळी, नरळद, कोथळा, पार्डी, शेवडी, राजुरा, टाकळी कुंभकर्ण, नांदापूर, खानापूर, मांडवा, जलालपूर, झरी, कुंभारी, वाडीदमई, हिंगला, सुलतानपूर, पिंपळा, सनपुरी आदी गावांना फायदा होणार आहे.पुनर्वसन समितीतर्फे शनिवारी (ता. १) प्रकल्पस्थळी अर्धा तास निदर्शने करत पाणी सोडण्यास विरोध करण्यात आला. मोरेगावजवळील बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक होते. मात्र, जालना आणि परभणी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
द्राक्ष उत्पादकांची दोन कोटींची फसवणूक नाशिक: दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, बटाट्याचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...