उजनी धरणातून सोडले भीमा नदीत पाणी

सोलापूर ः पुणे जिल्ह्यातील धरणांकडून येणाऱ्या विसर्गात वाढ झाली. त्यामुळे उजनी धरणाचे १६ दरवाजे ४४ सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. पूरस्थिती टाळण्यासाठी सोमवारी (ता.११) धरणातून पुढे भीमा नदीत सुमारे ४० हजार क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे.
Water Released from Ujani dam in the river Bhima
Water Released from Ujani dam in the river Bhima

सोलापूर ः पुणे जिल्ह्यातील धरणांकडून येणाऱ्या विसर्गात वाढ झाली. त्यामुळे उजनी धरणाचे १६ दरवाजे ४४ सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. पूरस्थिती टाळण्यासाठी सोमवारी (ता.११) धरणातून पुढे भीमा नदीत सुमारे ४० हजार क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, पंढऱपूरसह नदीकाठच्या गावांना संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन सावधानतेचा इशारा देण्यात आला.    

गेल्या आठवड्यातच उजनी धरणाने शंभर टक्केची पातळी गाठली. त्यानंतर पुणे जिल्ह्यात धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पाणलोटक्षेत्रात पुन्हा पावसाने सुरवात केली. त्यामुळे धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. त्यामुळे पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन धरणातून पुढे नदीत पाणी सोडणे, हाच पर्याय होता. त्यामुळे रविवारी (ता.१०) दुपारी धरणाचे १६ दरवाजे उघडून सुरवातीला १० हजार, त्यानंतर सायंकाळी २० हजार आणि रात्री २५ हजार क्युसेक असे टप्प्या-टप्प्याने नदीत पाणी सोडण्यात आले.

सोमवारी (ता.११) त्यात पुन्हा एकदा वाढ करून विसर्ग ४० हजार क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे पंढऱपूरसह भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पाणी पातळी १०९.९१ टक्केवर

उजनी धरणात सोमवारी (ता.११) एकूण पाणी पातळी ४९७.२७० मीटर इतकी राहिली. तर एकूण पाणीसाठा १२२.५४ टीएमसीपर्यंत आणि त्यापैकी ५८.८८ टीएमसी उपयुक्त साठा राहिला. तर या पाण्याची टक्केवारी १०९.९१ टक्केपर्यंत पोचली. 

कालवा, बोगद्यातही विसर्ग

धरणातून नदीत ४० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पण, त्याशिवाय मुख्य कालव्यात १६०० क्युसेक, भीमा सीना जोड कालव्याला १४८ क्युसेक, दहिगाव योजनेला ६३ क्युसेक आणि बोगद्याला १५० क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com