agriculture news in marathi, water reservation for rabbi season in Khandesh | Page 2 ||| Agrowon

रब्बीसाठी प्रकल्पांमधील पाण्याचे लवकरच आरक्षण

टीम अॅग्रोवन
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामाची शेतकरी तयारी करीत असून, विविध सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासंबंधी लवकरच पाणी आरक्षण केले जाणार आहे. 

जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामाची शेतकरी तयारी करीत असून, विविध सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासंबंधी लवकरच पाणी आरक्षण केले जाणार आहे. 

पाणी आरक्षणासंबंधी संबंधित प्रकल्पांच्या कालवा समित्या व प्रशासन यांची बैठक होईल. या वेळेस या प्रक्रियेमध्ये जलसंपदामंत्री, पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधी यांचा सहभाग नसणार. कारण, सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. निवडणुकांची धामधूम २४ ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे पाणी आरक्षणासंबंधी उशीर होऊ नये यासाठी प्रशासन व कालवा समित्यांची बैठक लवकरच होऊ शकते. जळगाव जिल्ह्यात गिरणा, वाघूर, हतनूर, धुळ्यात पांझरा, अनेर आणि नंदुरबारात दरा, सुसरी आदी प्रकल्पांमध्ये रब्बीसंबंधी सिंचनासाठी पाणी आरक्षित केले जाईल. 

जळगाव जिल्ह्यात सुमारे सव्वादोन लाख हेक्‍टरवर, धुळ्यात एक लाख आणि नंदुरबारातही सुमारे ८० ते ८५ हजार हेक्‍टरवर रब्बी पिके असतील. यातील निम्मे क्षेत्राला सिंचनासंबंधी प्रकल्पांमधून पाण्याची व्यवस्था होईल. गिरणा धरणाच्या माध्यमातून पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव आदी भागांतील २५ हजार हेक्‍टर, वाघूरच्या माध्यमातून भुसावळ, जळगावमधील सुमारे सात हजार हेक्‍टर क्षेत्रास तर हतनूरच्या माध्यमातून भुसावळ, यावल, रावेर व चोपडामधील मिळून सुमारे १८ हजार हेक्‍टर क्षेत्राला सिंचनाची सोय करता येणार आहे. 

धुळ्यात पांझरा प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे, शिंदखेडा, साक्री व अनेर प्रकल्पांमुळे शिरपूर व जळगावमधील चोपडा तालुक्‍यांतील अनेक गावांमध्ये सिंचनासंबंधी व्यवस्था होणार आहे. या भागातील कोरडवाहू कापूस पिकासही दोन वेळेस सिंचनासाठी या प्रकल्पांमधून पाणी मिळणार आहे. 

यामुळे कोरडवाहू कापूस पिकाच्या उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. कालवा समित्यांच्या बैठकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी पुढील आठवड्यात किंवा दिवाळीपूर्वी ही प्रक्रिया पार पडण्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
बोंडारवाडी धरणप्रश्नी मेढा येथे आंदोलनमेढा, जि. सातारा : बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे,...
ज्वारी उत्पादन यंदाही आतबट्ट्यातचनगर ः दोन वर्षं दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यंदा...
जांभुळणी तलावाच्या कालव्याला गळतीखरसुंडी, जि. सांगली : जांभुळणी (ता. आटपाडी) येथील...
महिला शक्‍तीतूनच नवसमाजाची जडणघडण  ः...अमरावती  ः ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती...
सोलापूर जिल्ह्यातील पाच नळपाणी योजना...सोलापूर : प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी...
परभणी जिल्ह्यात फळबागेची ६३९ हेक्टरवर...परभणी : यंदा सिंचन स्त्रोतांना पाणी उपलब्ध आहे....
आंबेगाव तालुक्यात प्रतिकूल हवामानामुळे...निरगुडसर, जि. पुणे ः यंदा हवामानातील बदल व...
नगर जिल्ह्यात ४८ हजार हेक्टरवर चारा...नगर : जिल्ह्यात यंदा पाण्याची बऱ्यापैकी...
जळगाव जिल्ह्यात तूर विक्रीबाबत ८००...जळगाव  ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीने...
पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व...
शेतीपंपांचा वीज वापर १६ टक्के; दाखविला...अकोला  ः शेतीपंपांचा वीज वापर १६ टक्केच होत...
कोल्हापुरात गवार, घेवड्याच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव, दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली, दरात...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...