agriculture news in marathi Water reserves in Khandesh started declining | Agrowon

खानदेशात जलसाठा घटू लागला

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 जून 2021

जळगाव ः खानदेशात गेल्या काही दिवसांमध्ये रब्बी, उन्हाळ पिकांसाठी प्रकल्पांमधून सोडलेले आवर्तन, उष्णता आदी कारणांमुळे एकूण जलसाठा ३२ टक्के एवढा झाला आहे. आता धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. 

जळगाव ः खानदेशात गेल्या काही दिवसांमध्ये रब्बी, उन्हाळ पिकांसाठी प्रकल्पांमधून सोडलेले आवर्तन, उष्णता आदी कारणांमुळे एकूण जलसाठा ३२ टक्के एवढा झाला आहे. आता धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. 

जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गिरणा धरणातील साठा ३१ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. या प्रकल्पाची क्षमता १८ टीएमसी एवढी आहे. वाघूर (ता.जामनेर) प्रकल्पाची क्षमता आठ टीएमसी आहे. त्यातही ३३ टक्के जलसाठा राहिला आहे. हतनूर (ता. भुसावळ) या तापी नदीवरील मध्यम प्रकल्पांतील जलसाठा ३० टक्केच राहिला आहे. गिरणा, वाघूर व हतनूर प्रकल्पांवर विविध शहरांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. वाघूर प्रकल्पातून जळगाव व जामनेर शहर आणि औद्योगिक वापरासाठी पाणी दिले जाते. गिरणा धरणातून मनमाड (जि.नाशिक), जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा व भडगाव शहरांसाठी पाणी योजना राबविलेल्या आहेत. 

सुमारे १२० गावांमधील टंचाई निवारणासाठी या धरणातून पाणी सोडावे लागते. रब्बीसाठीदेखील गिरणा धरणातून तीनदा आवर्तन सोडले आहे. चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, भडगाव तालुक्यातील २१ हजार हेक्टर क्षेत्राला या धरणातून पाणी सोडले होते. 

अनेरमधून उन्हाळ पिकांना पाणी 

धुळ्यातील मालनगाव, सोनवद, बुराई, पांझरा, अनेर या प्रकल्पांमधील साठा ३५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. अनेर प्रकल्पातून रब्बीसह उन्हाळ पिकांसाठी पाणी दिले आहे. पांझरा प्रकल्पातून धुळे शहरासह इतर गावांना पिण्याचे पाणी दिले जाते. धुळे, साक्री व शिंदखेड्यात रब्बीसाठी पाणी दिले जाते.


इतर बातम्या
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
पूर्व विदर्भात मुसळधार शक्य पुणे : कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर कराकोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  ...नाशिक : राज्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून,...
अमरावती जिल्हा परिषदेची सभा...अमरावती : पीकविमा भरपाई, समृद्धी महामार्गाच्या...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
दूधदरप्रश्‍नी वैजापूर बाजार समितीच्या...औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या...
खेडमध्ये बटाटा लागवडीस वेगचास, जि. पुणे : खेड तालुक्यात बटाटा लागवडीस...
स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात...आजरा, जि. कोल्हापूर : आजरा बाजारपेठेत स्थानिक...
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
पुणे बाजार समितीची ‘प्रादेशिक’ अधिसूचना...पुणे : पुणे बाजार समितीची निवडणूक टाळून सत्ता एका...
कांद्याची २५ दिवसांत विक्रमी अकरा लाख...नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात युरियाप्रश्नी प्रशासनाची धावपळजळगाव :  खानदेशात खरिपाला सुरवात होत असतानाच...
‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करापुणे ः राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय...
खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववतजळगाव :  खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५, ६ जुलै... मुंबई : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि...