Agriculture news in Marathi, Water reservoir at 98% in Satara Dam | Agrowon

साताऱ्यातील धरणांमध्ये ९८ टक्‍क्‍यांवर पाणीसाठा 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सर्व धरणे तुडूंब भरली आहेत. पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने अजून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. कोयना धरणातही ९९.४९ टक्के एकूण पाणीसाठा सुरू असून या धरणाच्या दरवाज्यातून विसर्ग बंद करण्यात आला असून पायथा वीज गृहातून २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. 

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सर्व धरणे तुडूंब भरली आहेत. पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने अजून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. कोयना धरणातही ९९.४९ टक्के एकूण पाणीसाठा सुरू असून या धरणाच्या दरवाज्यातून विसर्ग बंद करण्यात आला असून पायथा वीज गृहातून २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. 

जिल्ह्यात कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम- बलकवडी ही प्रमुख धरणे आहेत. कोयना धरण हे वीजनिमिर्तीच्या दृष्टीने महत्त्वाचे धरण आहे. पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. या धरणातून क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे १०७ टीएमपी पाणी नदीपात्रात सोडावे लागले आहे. इतर धरणांचीही हीच परिस्थिती झाली होती. या सर्व धरणांतून १५ टीएमसीपेक्षा अधिक पाणी सोडले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात १०४.७२ टीएमसी म्हणजेच ९९.४९ टक्के एकूण पाणीसाठा झाला आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्‍यांच्या दृष्टीने उरमोडी धरण महत्त्वाचे आहे. या धरणात अतिरिक्त झालेला पाणीसाठा दुष्काळी तालुक्यात सोडण्यात आल्याने माणगंगा नदी वाहती झाली आहे. पिके जगविण्यास या पाण्याचा फायदा झाला आहे. सध्या या धरणात ९.९२ टीएमसी म्हणेजच ९९.५५ टक्के एकूण पाणीसाठा आहे. या धरणातून ४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणी उपलब्धतेतमुळे एप्रिल, मे महिन्यांत पाणीटंचाई कमी भासण्यास मदत होणार आहे. कालव्याची कामे पूर्ण झाली असती तर अजून टंचाई कमी होण्यास मदत झाली असती. धोम धरणामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी अजूनही जास्त असून सध्या या धरणात १३.३८ टीएमसी म्हणजे ९९.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या या धरणातून ४६० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

कण्हेर धरणात ९.९८ टीएमसी म्हणजेच ९८.८१ टक्के पाण्याने भरले आहे. या धरणातून ५२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धोम-बलकवडी धरणात ४.०७ टीएमसी म्हणजेच ९९.६९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातून २९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तारळी धरणात ५.७६ टीएमसी म्हणजेच ९८.४५ टक्के भरले आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.


इतर ताज्या घडामोडी
माणसाचे प्राचीन पूर्वज खात झाडांचे कठीण...माणसांच्या प्राचीन पूर्वजांच्या आहारामध्ये...
प्लॅस्टिकच्या सूक्ष्मकणांचे खेकड्यांवर...सागरी किनाऱ्यावरील वाळूतील प्रौढ खेकड्यांच्या...
वस्तू खरेदीची बिले पंचायत समित्यांना...पुणे  : जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभ...
जैवविविधता नोंदणीसाठी धावपळपुणे: राज्यातील खेडोपाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
नगर जिल्ह्यात कांदा दरात चढउतार; शेतकरी...नगर  ः जिल्ह्यात मागील महिन्यात कांद्याला...
नांदेड, परभणी, हिंगोलीत साडेबारा लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
सातारा जिल्ह्यातील शेतकरी सौर...सातारा  : महावितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या...
मूर्तिजापूरमध्ये कृषी अधिकारी पोचले...अकोला  ः शेतकरी विविध प्रकारची पिके घेऊन...
औरंगाबाद जिल्ह्यात शेती आधारित उद्योग,...औरंगाबाद  : जिल्ह्याचा पालकमंत्री व...
नाशिक जिल्ह्यात रब्बीची एक लाख १५ हजार...नाशिक  : जिल्ह्यात रब्बी हंगामात एकूण १ लाख...
यवतमाळमध्ये ‘आधार’अभावी थकले कापूस...यवतमाळ  ः कापूस चुकाऱ्यासाठी बॅंक खाते आधार...
जळगाव जिल्ह्यात युरियाचा साठा संपला !जळगाव  ः खतांच्या वापरात आघाडीवर असलेल्या...
राजापुरात पावणेदोनशे क्विंटल भात खरेदीराजापूर, जि. रत्नागिरी  ः राजापूर तालुका...
पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा......विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या...
या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...
सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित...महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे...
माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लवकरच...पुणे  ः माथाडी आणि कामगार कायदा गुंतागुंतीचा...
नगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका ?नगर ः नगर, नाशिकसह राज्याच्या अनेक भागांत उशिरा...
धरण कालवा सल्लागार समितीची आज नगरला बैठकनगर  : मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या...
परभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूरपरभणी  ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...