मुळा धरणात पन्नास टक्क्यांच्या पुढे पाणीसाठा

मुळा धरणात पन्नास टक्क्यांच्या पुढे पाणीसाठा
मुळा धरणात पन्नास टक्क्यांच्या पुढे पाणीसाठा

नगर : जिल्ह्याच्या अनेक भागांत अजून पावसाचा जोर नाही. मात्र, भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात चांगला पाऊस झाल्याने मुळा धरणाचा पाणीसाठा गुरुवारी (ता. १) सकाळी पन्नास टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

भंडारदरा धरणात ८० टक्के पाणी साठले असल्याने दरवर्षी प्रमाणे यंदा भंडारदरा १५ ऑगस्टच्या अगोदर भरण्याची आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या अन्य भागात मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिपही थांबली आहे. अकोल्यातही पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. 

नगर जिल्ह्यातील अनेक भागात अजूनही जोरदार पाऊस नाही. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात रिपरिप सुरू होती. काही भागात पाऊस बरा झाला, मात्र पाणीसाठा वाढीसाठी मात्र अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात पडणाऱ्या पावसावरच मुळा, भंडारदरा व निळवंडे तसेच जायकवाडी धरणाचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे या भागातील पावसाबाबतही उत्सुकता असते. गेल्या काही दिवसांपासून या भागात पाऊस पडत असल्याने मुळा धरणात १३ टीएमसीपेक्षा जास्ती पाणीसाठा झाला असून आज सकाळी कोतुळ जवळ ११ हजार १५२ क्युसेकने वाहत होती. अकरा टीएमसी क्षमता असलेल्या भंडारदरा धरणात गुरूवारी सकाळी सहा वाजेपर्यंत पावने नऊ टीएमसी म्हणजे ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. अजून चार ते पाच दिवस पाऊ टीकून राहीला तर धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. आठ टीएमसी क्षमता असलेल्या निळवंडे धरणात ४३ टक्के म्हणजे पावणेपाच चार टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 

भंडारदऱ्यातून पाणी सोडल्यावर हे धरणही झपाट्याने भरेल. जिल्ह्याच्या अन्य भागात मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम असली तरी भंडारदरा, मुळा, निळवंडे धरणात पाणी जमा होत असल्याने जिल्ह्याच्या उत्तर भागाला दिलासा मिळत आहे. आज सकाळी सहा वाजेपर्यंत झालेला पाऊस असा.  घाटघर : ९४,  रतनवाडी : १३४,  पांजरे : १११, वाकी : ९४, भंडारदरा : ९५, निळवंडे : २८, अकोले : ३७, कोतुळ : ३२, संगमनेर : १३, ओझर : १६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com