agriculture news in marathi, Water resources in the project Concerns raised | Agrowon

मराठवाड्यात प्रकल्पांतील पाणीसाठ्यांनी वाढविली चिंता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची जुलैअंतीची स्थिती सर्वांचीच चिंता वाढविणारी आहे. सर्वाधिक ७४६ लघुप्रकल्पांमध्ये केवळ १२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा असून ३४ मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. तीन मोठ्या प्रकल्पातही उपयुक्‍त पाणीसाठा नसून जालना औरंगाबादमधील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यांची स्थिती बिकट आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची जुलैअंतीची स्थिती सर्वांचीच चिंता वाढविणारी आहे. सर्वाधिक ७४६ लघुप्रकल्पांमध्ये केवळ १२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा असून ३४ मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. तीन मोठ्या प्रकल्पातही उपयुक्‍त पाणीसाठा नसून जालना औरंगाबादमधील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यांची स्थिती बिकट आहे.

मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी, सिद्धेश्वर व सिनाकोळेगाव या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. दुसरीकडे उर्वरित आठ प्रकल्पांमध्ये केवळ १२ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी, उर्ध्व पेनगंगा प्रकल्पात प्रत्येकी ३२ टक्‍के, निम्न तेरणा प्रकल्पात ४१ टक्‍के तर सुरवातीला मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रमाण राहिलेल्या विष्णूपूरी प्रकल्पात ९३ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

बीडमधील माजलगाव प्रकल्पात १ टक्‍के, मांजरामध्ये ५ टक्‍के, नांदेडमधीलच निम्न मनारमध्ये १० टक्‍के तर निम्न दुधना प्रकल्पात ३६ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३४ प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. उर्वरित मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ १५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील तेरा मध्यम प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. तर तीन मध्यम प्रकल्पांत केवळ २ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

जालना जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्पांत केवळ ८ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. तर २ मध्यम प्रकल्पात उपयुक्‍त पाणीच नाही. परभणी जिल्ह्यातील दोनपैकी एका प्रकल्पांत उपयुक्‍त पाणीसाठा नाही. तर एका प्रकल्पात केवळ ४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघु प्रकल्पांमध्ये ६ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

जालना जिल्ह्यातील ५७ लघु प्रकल्पांत केवळ १ टक्‍का उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे. बीड जिल्ह्यातील १२६ लघु प्रकल्पांमध्येही केवळ ४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. परभणी जिल्ह्यातील २२ लघुप्रकल्पांमध्ये ५ टक्‍के उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे. मध्यम ७५ प्रकल्पांपैकी तब्बल ५८ प्रकल्पात २५ टक्‍क्‍यांपेक्षाही कमी उपयुक्‍त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

उपयुक्‍त पाणी नसलेले जिल्हानिहाय मध्यम प्रकल्प
औरंगाबाद १३
जालना ०२
बीड ०८
लातूर ०३
उस्मानाबाद ०५
नांदेड ०२
परभणी ०१

 

इतर अॅग्रो विशेष
राजद्रोह कायद्याची गरज काय?का ही वर्षांपूर्वीची ही घटना आहे. एका...
को-मार्केटिंगचा घोळबियाणे, खते, कीडनाशके या कृषी उत्पादनासाठीच्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाचा टोमॅटो पिकाला...नाशिक: जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांत झालेल्या...
झोपडीचा आधार बांबू पोचला सातासमुद्रापारवेलतूर, जि. नागपूरः गरिबांच्या झोपडीचा आधार...
देशाच्या उत्तर-मध्य बहुतांश भागातून...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल-दरमजल...
रब्बीसाठी अनुदानित हरभरा बियाणे उपलब्धपुणे: राज्यात गेल्या रब्बी हंगामात अनुदानित हरभरा...
बुधवारपासून पावसाची शक्यतापुणे: देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू...
पावासामुळे खरीप पिके, भाजीपाल्यासह...पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वादळी...
कलम ३७० पुन्हा आणून दाखवा : नरेंद्र मोदीजळगाव  : हिंमत असेल तर, जम्मू-काश्मीरबाबत...
पीक बदलातून दिली नवी दिशाशिरपूर जैन (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथील...
अमेरिकेतील भातशेतीची शिवारफेरीअमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये सॅक्रामेंटो...
परतीचा प्रवास वेगाने; मध्य, पूर्व...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून)...
सातारा : उसावर अमेरिकन लष्करी अळीचा...सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पडणाऱ्या...
राष्ट्रीय संस्थांमध्ये कृषी...दापोली, जि. रत्नागिरी : राष्ट्रीय कृषी...
...हे खूपच संतापजनक आहे : राजू शेट्टीसध्या शेतकऱ्याला भाकरीची गरज आहे, त्याच्या पुढे...
कृषी शिक्षणव्यवस्थेला हवी दिशादेशातील सर्वांत जास्त कृषी विद्यापीठे आणि कृषी...
कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा...मुंबई : मधुमेहासारख्या २०० चाचण्या १ रुपयात...
जैवविविधतेचा ऱ्हास करणारा प्रकल्प नकोचनियोजित नवमहाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पाचं क्षेत्र...
पाण्याचा ताळेबंद गरजेचाच नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावाने यंदाच्या...