परभणी जिल्ह्यात रब्बीत चार; तर उन्हाळी हंगामात दोन पाणी आवर्तने

परभणी जिल्ह्यात रब्बीत चार; तर उन्हाळी हंगामात दोन पाणी आवर्तने

परभणी : यंदा परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम आणि २० लघुप्रकल्पांतून मिळून रब्बीत ३८५६ आणि उन्हाळी हंगामात १ हजार ६३१ हेक्टर असे दोन्ही हंगामांत मिळून एकूण ५ हजार ४८७ हेक्टर सिंचन क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. मध्यम प्रकल्पातून रब्बीमध्ये प्रत्येकी चार; तर उन्हाळी हंगामात प्रत्येकी दोन पाणी आवर्तने सोडण्यात येतील, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पात ७५ टक्के आणि गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. रब्बी हंगामात करपरा प्रकल्पातून १ हजार ५०; तर मासोळी प्रकल्पातून १३५० हेक्टर एवढे सिंचनक्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. उन्हाळी हंगामामध्ये या प्रकल्पांतून अनुक्रमे ५९० आणि ६३० हेक्टर एवढे सिंचन क्षेत्र प्रस्तावित आहे. मध्यम प्रकल्पातून रब्बीत प्रत्येकी चार; तर उन्हाळी हंगामात प्रत्येकी दोन पाणीपाळ्या सोडण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील २२ पैकी २० प्रकल्पांतून रब्बीमध्ये १ हजार ४५६ आणि उन्हाळी हंगामात ४११ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. पेडगाव तलावात ८ टक्के आणि आंबेगाव तलावात २४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. या तलावातून अनुक्रमे रब्बीत १५ आणि ५५ हेक्टर सिंचनक्षेत्र प्रस्तावित आहे. तांदूळवाडी तलावात १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा असून रब्बीत १३५ तर उन्हाळी हंगामात ६० हेक्टर सिंचन क्षेत्र प्रस्तावित आहे. राणी सावरगाव तलावात १०० टक्के; तर नखातवाडी तलावात ६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून या तलावांतून रब्बीत अनुक्रमे १०० आणि ९० हेक्टर सिंचनक्षेत्र प्रस्तावित आहे.

टाकळवाडी तलावात १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा असून रब्बीत १२३ हेक्टर सिंचन क्षेत्र प्रस्तावित आहे. कोद्री तलावात १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा असून रब्बीत १३५ तर उन्हाळी हंगामात ६५ हेक्टर सिंचन क्षेत्र प्रस्तावित आहे. पिंपळदरी तलावात ६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून रब्बीत २४० आणि उन्हाळी हंगामात १२० हेक्टर सिंचन क्षेत्र प्रस्तावित आहे. देवगाव तलावात ६५ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून रब्बीत ४५ तर उन्हाळी हंगामात ३० हेक्टर सिंचनक्षेत्र प्रस्तावित आहे. वडाळी आणि जोगवाडा तलावात प्रत्येकी २० टक्के उपयुक्त पाणीसाठा असून या तलावांतून रब्बीत अनुक्रमे ५० आणि ३० हेक्टर सिंचन क्षेत्र प्रस्तावित आहे.

बेलखेड तलावात शंभर टक्के उपयुक्त पाणीसाठा असून रब्बीमध्ये ८० आणि उन्हाळी हंगामात ५० हेक्टर सिंचन क्षेत्र प्रस्तावित आहे. चारठाणा तलावात ४० टक्के; तर पाडाळी तलावात ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून या तलावांतून रब्बीत प्रत्येकी ६० हेक्टर; तर पाडाळीतून उन्हाळीत ४१ हेक्टर सिंचन क्षेत्र प्रस्तावित आहे. केहाळ तलावात १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून रब्बीत १५ हेक्टर सिंचन क्षेत्र प्रस्तावित आहे. कवडा तलावात ७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून रब्बीत ६० आणि उन्हाळी हंगामात ४५ हेक्टर सिंचन क्षेत्र प्रस्तावित आहे. मांडवी तलावात ६२ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून रब्बीत ९६ हेक्टर सिंचन क्षेत्र प्रस्तावित आहे.दहेगाव, आडगाव, चिंचोली तलावात अनुक्रमे ३०, १८, २१ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून या तलावांतून रब्बीत अनुक्रमे ४०, १२ आणि १५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com