agriculture news in marathi, water rotation useful for crops, parbhani, maharashtra | Agrowon

जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक सिंचनासाठी फायदा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा खंड आहे. या स्थितीत खरीप पिकांच्या सिंचनासाठी जायकवाडी धरणातून डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले संरक्षित पाणी आवर्तन सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डाव्या कालव्याच्या पाण्यामुळे झरी (ता. पाथरी) येथील तलावांमध्ये रविवारी (ता. १८) सकाळी आठपर्यंत ४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. ढालेगाव, खडका बंधाऱ्यांमध्ये कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. उजव्या कालव्याच्या पाण्यामुळे माजलगाव धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा खंड आहे. या स्थितीत खरीप पिकांच्या सिंचनासाठी जायकवाडी धरणातून डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले संरक्षित पाणी आवर्तन सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डाव्या कालव्याच्या पाण्यामुळे झरी (ता. पाथरी) येथील तलावांमध्ये रविवारी (ता. १८) सकाळी आठपर्यंत ४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. ढालेगाव, खडका बंधाऱ्यांमध्ये कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. उजव्या कालव्याच्या पाण्यामुळे माजलगाव धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे डिग्रस बंधाऱ्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. येलदरी, सिध्देश्वर या धरणांतील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. परंतू,या दोन्ही धरणांमध्ये अद्याप उणे पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. २० लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून परभणी जिल्ह्यात पावसाची उघडीप आहे. त्यामुळे जिल्ह्यातील झरी (ता.पाथरी) येथील लघु तलाव वगळता अन्य लघू तलावातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.

निवळी (ता.जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्प, सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे या प्रकल्पातील पाणीसाठ्यात बाष्पीभवन तसेच उपश्यामुळे घट झाली आहे. रविवारी (ता.१८) सकाळी आठ वाजेपर्यंत निम्न दुधना प्रकल्पामध्ये उणे १९.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. येलदरी धरणात उणे १.८३ टक्के, सिध्देश्वर धरणात उणे ५९.६४ टक्के पाणीसाठा होता.गोदावरील नदीवरील डिग्रस बंधाऱ्यामध्ये १.२३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे.

रविवारी (ता.१८) सकाळी आठ वाजता जायकवाडी धरणातून डाव्या कालव्याद्वारे १४०० क्युसेक, उजव्या कालव्याद्वारे ९०० क्युसेक, नदीपात्रामध्ये जलविद्युत केंद्रातून १५८९ क्युसेक, दरवाजाद्वारे ४१९२ क्युसेक असा एकूण ८ हजार ८१ क्युसेक विसर्ग सुरू होता. उजव्या कालव्याद्वारे ०.०६ टीएमसी पाण्याची आवक झाल्यामुळे माजलगाव धरणात एकूण २.२९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. डाव्या कालव्याच्या पाण्यामुळे झरी (ता.पाथरी) येथील लघू तलावांमध्ये ०.०२५ टिएमसी (४५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. यामुळे परिसरातील गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे.

डाव्या कालव्याद्वारे ढालेगाव (ता. पाथरी) तसेच खडका (ता. सोनपेठ) येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. ढालेगाव बंधारा भरल्यानंतर मुद्दगल  येथील बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्यात येईल. डाव्या कालव्याचे पाणी परभणी तालुक्यात पोचले आहे.परंतु गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आलेले पाणी जिल्ह्यात पोचले नव्हते.


इतर ताज्या घडामोडी
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...