Agriculture news in Marathi, water scarcity in २४ talukas of Pune region | Agrowon

पुणे विभागातील २४ तालुक्यांत पाणी टंचाई हटेना

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

पुणे : पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणे ओसंडून वाहिली. या जिल्ह्यांच्या अनेक धरणातून जवळपास महिनाभर सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर दुसरीकडे संपूर्ण सोलापूरसह, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात मात्र पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. यामुळे या भागात टंचाई कायम असल्याने २४ तालुक्यांतील ५०० गावे ३१३६ वाड्यांमध्ये तीव्र टंचाई कायम आहे. टंचाईग्रस्त भागात तहान भागविण्यासाठी ५८५ टॅंकरने धावत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.  

पुणे : पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणे ओसंडून वाहिली. या जिल्ह्यांच्या अनेक धरणातून जवळपास महिनाभर सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर दुसरीकडे संपूर्ण सोलापूरसह, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात मात्र पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. यामुळे या भागात टंचाई कायम असल्याने २४ तालुक्यांतील ५०० गावे ३१३६ वाड्यांमध्ये तीव्र टंचाई कायम आहे. टंचाईग्रस्त भागात तहान भागविण्यासाठी ५८५ टॅंकरने धावत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.  

उजनी धरण भरल्याने भिमेला पूर आला असतानाच, दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये टंचाई वाढली आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण आसंडून वाहत आहे. तर माण तालुक्यातही तीव्र टंचाई भासत असून, खटाव, फलटणमध्ये काही भागात टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे. 

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, आंबेगाव तालुक्यात, तर पूरस्थितीचा सामना करणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यातही पाणी टंचाई कायम आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३०१ गावे १ हजार ५९६ वाड्यांमध्ये सर्वाधिक ३४५ टॅंकर सुरू आहेत. सांगली जिल्ह्यातील ७७ गावे ५९२ वाड्यांना ८८ टॅंकरने पाणी पुरविले जात आहे. साताऱ्यातील ८२ गावे ६२४ वाड्यांना १०२ टॅंकरने, तर पुणे जिल्ह्यातील ४० गावे ३२४ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ५० टॅंकर धावत आहेत. 

विभागातील एक लाख १२ हजारांहून अधिक लोकसंख्या, सातारा, सांगली, सोलापूरमधील ४ लाख ५९ हजार पशुधनासाठी टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख ९८ हजार, सांगलीतील १ लाख ७८ हजार, साताऱ्यातील जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४५ हजार, पुणे जिल्ह्यातील १ लाख १ हजार लोकसंख्येचे समावेश आहेत. सातारा जिल्ह्यातील ७३ हजार, तर सांगलीतील सुमारे २६ हजार, तर सोलापूरातील ३ लाख ६० हजारांहून अधिक जनावरांना टॅंकरने पाणी पुरविण्यात येत आहेत.    
 


इतर ताज्या घडामोडी
ठिबक सिंचनातील पंप निवडीसाठी तांत्रिक...महाराष्ट्रामध्ये शेतकरी कापूस, हळद, ऊस, संत्रा,...
वारणा, गोकुळ दूध संघांकडून दरात वाढकोल्हापूर : जिल्हा दूध संघ (गोकुळ) आणि वारणानगर...
नाशिक : अतिवृष्टीनंतर कपाशीवर करपाचा...नाशिक : अतिवृष्टीमुळे सातत्याने कपाशी लागवडीमध्ये...
कृषी संशोधन केंद्रे पांढरा हत्ती ठरू...भंडारा ः सर्वाधिक रोजगार शेतीमधून उपलब्ध होऊ शकतो...
मधमाश्या, मित्रकीटक वाचविण्यासाठी...नाशिक: मधमाश्यांची संख्या जगभरात तसेच भारतातही...
बाधितांसाठी मागितले दहा कोटी अन्‌...आटपाडी, जि. सांगली ः अवकाळी पावसामुळे आटपाडी...
शेतकरी संघटनेचे गुरुवारी निर्बंधमुक्ती...नगर ः संपूर्ण कर्जमाफी करून राज्यातील शेतकऱ्यांचा...
पुणे : फळपीक विमा योजना असून नसल्यासारखीपुणे : फळपिकांना हवामानाच्या धोक्यापासून संरक्षण...
गडहिंग्लजमध्ये ज्वारीचे क्षेत्र एक हजार...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : अतिवृष्टी आणि अवकाळी...
बाजारपेठेवर आधारित पीकपद्धतीचा अवलंब...नगर  : ‘‘कमी पाणी व जास्त पाणी, अशा दोन...
नवीन वर्षात ७५० ग्रामपंचायतींच्या...पुणे : येत्या नवीन वर्षात जुलै ते डिसेंबर २०२० या...
हिंगोली जिल्ह्यात रब्बीची ७६ हजार...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सोमवार...
पुण्यात पालेभाज्यांसह कांद्याच्या आवकेत...पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
गहू, हरभरा पिकांसाठी एकात्मिक...या वर्षी परतीच्या पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने...
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...