राज्यातील ४८६ गावे, २६६ वाड्यांमध्ये पाणीटंचाई

पाणीटंचाई
पाणीटंचाई

पुणे: जूलै महिना संपत आला असतानाही पावसात पडेल्या खंडामुळे राज्याच पाणीटंचाईच्या झळा अद्याप कायम आहेत. पावसाने ओढ दिल्याने खालावलेल्या भूजल पातळीसह पिण्याच्या पाण्याचे स्राेत अद्यापही कोरडेच आहेत. सोमवारपर्यंत (ता. २३) राज्याच्या दहा जिल्ह्यांतील तब्बल ४८६ गावे आणि २६६ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यासाठी ४५९ टॅंकर सुरू असल्याची माहिती राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे देण्यात आली. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मात्र मराठवाडा, उत्तर आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या कोरडवाहू भागात पावसाची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद, नांदेड, जालना, नाशिक, धुळे, जळगाव, नगर, पुणे, सातारा जिल्ह्याला पाणीटंचाईने ग्रासले आहे. वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यातही पाणीटंचाई कायम आहे. अौरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक टंचाई असून २०२ गावे आणि २ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी १८४ टॅंकर धावत आहेत. तर कोकणासह, पुर्व विदर्भात मात्र पाणीटंचाई दूर झाली अाहे. गतवर्षीच्या तुलनेत राज्यात यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे. गेल्या वर्षी २४ जुलै राेजी राज्यातील ५१६ गावे, एक हजार ७७३ वाड्यांमध्ये टंचाई असल्याने ४६१ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती विभागात टंचाई होती. गतवर्षी पुणे विभागात टंचाईची तीव्रता अधिक होती, तर यंदा अाैरंगाबाद विभागात सर्वाधिक टंचाई भासत आहे. राज्यात पाणीटंचाई हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहेत. गेल्या आठवड्यात (ता. १६) राज्यातील ६७७ गावे २७३ वाड्यांची तहान भागविण्यासाठी ७०६ टॅंकर सुरू होते. संपुर्ण टंचाई निवारणसाठी पावसाने दडी मारलेल्या भागात दमदार सरींची आवश्‍यकता आहे. सोमवारपर्यंत (ता. २३) राज्यातील जिल्हानिहाय टंचाईची स्थिती 

जिल्हा     गावे वाड्या   टॅंकर
नाशिक     ६६   ८३  ५०
धुळे   ११    ०      ९
जळगाव    ५१   0    ३७  
नगर  १७      ६६  २१
पुणे     ३    २९  ४
सातारा    १२    ५७    १०
अौरंगाबाद   २०२     २     १८४
जालना   ४८    ५    ६२
नांदेड     १५    २४    २०
बुलडाणा    ६१   ०   ६२

राज्यातील विभागीय टंचाईची स्थिती

विभाग     गावे     वाड्या   टॅंकर
नाशिक     १४५     १४९    ११७
पुणे    १५    ८६    १४
औरंगाबाद   २६५   ३१   २६६
अमरावती    ६१     ०    ६२
एकूण     ४८६    २६६    ४५९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com