पाचशे गावांमध्ये टंचाईच्या झळा

टॅंकर
टॅंकर

पुणे : पावसाने ओढ दिल्याने भूजल पातळी खालावली आहे. राज्यातील ४९८ गावे आणि ९५९ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत असल्याने पाणीपुरवठ्यासाठी ५७५ टॅंकर सुरू आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टंचाईची तीव्रता अधिक असून, नाशिक, पुणे, औरंगाबाद विभागात पाणीटंचाई वाढली आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अवघ्या ११३ गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी ८९ टॅंकर सुरू होते, राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे ही माहिती देण्यात आली.  यंदाच्या हंगामात अखेरच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने राज्याला तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. धरणांच्या पाणीसाठ्यातही वेगाने घट होऊ लागली आहे. कोरडवाहू पट्ट्यात तर रब्बीच्या पेरण्याही झालेल्या नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न भेडसावत असतानाचा आता पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आताच अंतिम घटका मोजत असल्याने यंदाच्या उन्हाचा तीव्र टंचाईचा असणार आहे. यंदा औरंगाबाद जिल्ह्याला सर्वाधिक झळा बसत असून, नाशिक, नगर, सातारा, जालना जिल्ह्यातही पाणीटंचाई चांगलीच वाढली आहे. मराठवाड्यातील अौरंगाबाद विभागात २४४ गावे, ७ वाड्यांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी सर्वाधिक ३१६ टॅंकर सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक २१० गावे चार वाड्यांसाठी २६१ टॅंकर सुरू असून, जालना नांदेड, बीडसह उस्मानाबाद जिल्ह्यात टंचाईने डोके वर काढले आहे. नाशिक विभागातील नाशिक, नगर, धुळे, जळगाव जिल्ह्यातील २०७ गावे, ७०८ वाड्यांना २०८ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तर पुणे विभागातील सातारा, पुण्यापाठोपाठ सांगली आणि सोलापुरात टंचाई भासण्यास सुरवात झाली असून, ३७ गावे २४४ वाड्यांमध्ये ४२ टॅंकरने आणि अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यातील १० गावांना ९ टॅंकरने पाणी देण्यात येत असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com