भंडारा जिल्ह्यावर यंदाही पाणीटंचाईचे सावट 

तलावांचा जिल्हा, अशी ओळख असलेल्या भंडाऱ्यावरही पाणी टंचाईचे संकट दर वर्षीप्रमाणे यंदाही घोंघावत आहे.
भंडारा जिल्ह्यावर यंदाही पाणीटंचाईचे सावट Water scarcity in Bhandara district again
भंडारा जिल्ह्यावर यंदाही पाणीटंचाईचे सावट Water scarcity in Bhandara district again

भंडारा : तलावांचा जिल्हा, अशी ओळख असलेल्या भंडाऱ्यावरही पाणी टंचाईचे संकट दर वर्षीप्रमाणे यंदाही घोंघावत आहे. यंदा मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १३४ गावांतील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाणीपुरवठा विभागाकडून ५ कोटी ३४ लाख रुपयांचा कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. 

बानवथडी, चुलबंद नदी काठावरील गावांमध्ये पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. या उलट वैनगंगा नदी काठावरील नागरिकांना दूषित पाण्यामुळे कायमच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सर्वाधिक तलाव असल्याने तलावांचा जिल्हा अशी भंडाऱ्याची ओळख आहे. मात्र वाहून जाणाऱ्या पाण्याला अडविण्याविषयी आणि ते भूगर्भात जिरविण्यासाठीच्या उपायांकडे दुर्लक्ष होते. परिणामी पाणीटंचाईचे संकट देखील वर्षांनुवर्षापासून जिल्ह्यावर कायम आहे. त्यातच उन्हाळा आला की पाणीटंचाई आराखडा तयार होतो. तो देखील कागदावरच मर्यादित असल्याने प्रत्यक्षात फारसा फरक दिसून येत नाही.

यंदा ६६८ गावांत पाणीटंचाईची शक्‍यता कृती आराखड्यातून वर्तविण्यात आली आहे. त्यासाठी ५ कोटी ३४ लाख रुपयांच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे भंडारा जिल्हा हा टॅंकरमुक्‍त म्हणून ओळखला जातो. गेल्या दोन दशकात टॅंकरने पाणीपुरवठ्याची वेळ आली नाही. मात्र मे महिन्यात पाणीटंचाई तीव्र होते. अशा टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना खासगी टॅंकरव्दारे पाणी बोलवावे लागते. लाखनी, लाखांदूर आणि साकोली तालुक्‍यातील गावे यामध्ये आघाडीवर आहेत.

दरम्यान प्रशासनाने या वर्षी चार विहिरींच्याच अधिग्रहणाचा प्रस्ताव दिला आहे. या वर चार लाख रुपयांचा खर्च होणार आहे. सोबतच १९१ गावात २१८ विंधन विहिरी खोदण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी २ कोटी ५२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. २०२ गावातील ३०९ विंधन विहिरींची दुरुस्ती केली जाईल. त्यावर ४६ लाख रुपयाचा खर्च प्रस्तावीत आहे.

पाणीटंचाईवर दृष्टिक्षेप

  •   जिल्ह्यातील एकूण गावे ः ८९८ 
  •   टंचाईग्रस्त गावे ः ४६८ 
  •   बोअरवेल दुरुस्ती ः ३०९ 
  •   विहिरीतील गाळ काढणे ः ५१ 
  •   बोअरवेल खोदकाम ः २१८ 
  •   पाणीपुरवठा योजना दुरुस्ती ः ४५
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com