सरदार सरोवर
सरदार सरोवर

आटणाऱ्या जलाशयांमुळे जलसंकट

लंडन ः हवामान बदल आणि पावसाचे घटणारे प्रमाण यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये जलाशयातील पाणीसाठे कमी होत अाहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पाणीसंकट मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. भारत, मोरोक्को, इराक आणि स्पेन या देशांमध्ये जलाशयातील पाणीपातळी खालावत आहे. त्यामुळे या देशातील पाणीसाठ्यांवर परिणाम होऊन पाणीसंकट वाढणार आहे, अशी माहिती उपग्रहाद्वारे केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षातून मिळाली आहे. उपग्रहाच्या आधारे जगभरातील जलाशयांचे अवलोकन करून त्याचा निष्कर्ष नुकताच प्रकाशित करण्यात आला. ‘‘सध्या जगभारातील अनेक देशांमध्ये जलाशयांतील पाणीसाठा कमी होत आहे. भारत, मोरोक्को, इराक आणि स्पेन या चार देशांतील जलाशयांतील पाणीसाठा जलदगतीने कमी होत आहे. या देशांमधील तब्बल ५ लाख जलाशये संकुचित पावत आहेत. यामुळे अलीडेच टोकाच्या पाणीटंचाईने ओढावलेल्या ‘डे झीरो’ या परिस्थितीचा अनुभव या देशांनाही लवकरच येईल. उपग्रहाद्वारे येणाऱ्या काळात पाण्याचे नळ कोरडे पडणाऱ्या भागाची चाचणी करण्यात आली. यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे,’’ असेही अहवालात म्हटले आहे. ‘‘सर्वांत चिंतेची बाब म्हणजे भारतात पाणीसाठा कमी होणाऱ्या जलाशयांमध्ये नर्मदा नदीवरील दोन जलाशयांचा समावेश आहे. तसेच मध्य प्रदेशात मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने इंदिरा सागर सरोवरातील पाणीपातळी खालावली आहे. तसेच सरदार सरोवरातून कमी पाऊस झाल्याने जवळपास तीन कोटी लोकांना पिण्यासाठी पाणी दिल्याने सरोवरातील पाणी कमी झाले,’’ अशी माहिती अहवालात दिली आहे.  अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहराने देशभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. सतत तीन वर्षांच्या दुष्काळामुळे येथील प्रशासनाने ‘डे झीरो’ म्हणजेच पाणीटंचाईची गंभीर स्थिती जाहीर केली. परंतु सध्या जगातील डझनभर देशांमध्ये वाढती पाण्याची मागणी, अयोग्य व्यवस्थापन आणि हवामान बदल यामुळे अशेच संकट येण्याची भीती आहे, असे जागतिक संसाधन संस्थेने म्हटले आहे.  स्पेनमध्ये दुष्काळाचा फटका  स्पेन देशामध्ये सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे येथील जलाशयांतील पाणीसाठा घटत आहे. येथील सर्वांत मोठ्या ब्यून्डीया सरोवरातील पाणीसाठा यंदा ६० टक्क्यांनी घटला आहे. मोरोक्को देशातही दुष्काळ, सिंचनासाठी पाण्याचा अतिवापर आणि पिण्यासाठी शहरांना जास्त पुरवठा यामुळे येथील जलाशये आटत आहेत. इराक देशात पावसातील तूट आणि जलविद्युत प्रकल्पासाठी लागणारे पाणी यामुळे जलाशयांतील पाणीसाठा कमी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com