agriculture news in Marathi water scarcity increased in Pune Division Maharashtra | Agrowon

पुणे विभागात टंचाई वाढू लागली 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 मे 2020

उन्हाचा चटका वाढताच विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्याच्या कोरडवाहू भागामध्ये पाणी टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत.

पुणे  : उन्हाचा चटका वाढताच विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्याच्या कोरडवाहू भागामध्ये पाणी टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. विभागातील टंचाईग्रस्त १५ गावे ५८ वाड्यांमधील १९ हजार ३०९ नागरिक तसेच साताऱ्यातील २ हजार ७१९ जनावरांची तहार भागविण्यासाठी १५ टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. 

गतवर्षी चांगला पाऊस पडल्याने यंदा विभागातील पाणीसाठे, भूजल पातळीची स्थिती चांगली असल्याने टंचाई कमी आहे. गतवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला विभागातील तब्बल ६८५ गावे, ४ हजार २८२ वाड्यांना ८२३ टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. यंदा मात्र अनेक दुष्काळी गावे अद्यापही पाणीदार असल्याने अद्याप टॅंकर सुरू करावा लागला नाही. उन्हाच्या झळा वाढताच टंचाईदेखील वाढणार असल्याने मात्र यंदा टंचाई कमीच राहण्याची शक्यता आहे. 

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील २ गावे २ वाड्या, खेड तालुक्यातील १ गाव १३ वाड्यांना ३ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. तर दुष्काळी बारामती, इंदापूर, पुरंदर तालुक्यात अद्याप एकही टॅंकर सुरू नाही. साताऱ्यातील माण, खटाव, कोरेगाव, वाई, पाटण तालुक्यात टंचाई भासू लागल्याने ७ गावे ९ वाड्यांमध्ये ७ टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या अंकलगी, गोंधळेवाडी, सोन्याळ, मडग्याळ ही गावे आणि २६ वाड्यांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी ४ टॅंकर सुरू आहेत. तसेच सोलापूरच्या माढा तालुक्यातील पडसाळे गाव आणि आठ वाड्यांना एका टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने पुणे विभागीय आयुक्तालयातर्फे सांगण्यात आले. 

पुणे विभागातील पाणी टंचाईची स्थिती 

जिल्हा गावे वाडा टॅंकर 
पुणे १५ ३ 
सातारा
सांगली २६ ४ 
सोलापूर
एकूण १५ ५८ १५ 

इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...