पाणीटंचाईची धग वाढली

पाणीटंचाईची धग वाढली
पाणीटंचाईची धग वाढली

पुणे  : राज्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच असल्याने पाणीटंचाई गंभीर होत आहे. १५ जिल्ह्यांतील १२३७ गावे २७०० वाड्यांना टंचाईच्या झळा बसत असल्याने पाणीपुरवठ्यासाठी १४६८ टॅंकर डिसेंबरअखेर सुरू करण्यात आले आहेत. औरंगाबाद, नाशिक विभागात पाणीटंचाई सर्वाधिक असून, पुणे आणि अमरावती विभागांतही टॅंकरच्या मागणीत वाढ झाली आहे.  डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला (ता. ३) राज्यातील ८०६ गावे आणि १८५६ वाड्यांमध्ये टंचाई होती. तर पाणीपुरवठ्यासाठी ९६८ टॅंकर सुरू होते. मात्र पुढील महिनाभरामध्ये आणखी ४३१ गावे, ८४४ वाड्या टंचाईच्या खाईत गेल्या असून, टॅंकरची संख्या ५३० ने वाढली आहे. गतवर्षी १ जानेवारी रोजी राज्यातील केवळ १७० गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी १३६ टॅंकर सुरू होते. यंदा दुष्काळाची दाहकता अधिक असल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे.  अौरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील ६६० गावे ९७ वाड्यांमध्ये ८४३ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ३९४ गावे ३२ वाड्यांसाठी ५१७ टॅंकर सुरू आहेत. नाशिक विभागातील नगर, नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांतील ४२३ गावे, १६७३ वाड्यांना ४६९ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे विभागातील सातारा, पुणे, सांगली आणि सोलापुरात टंचाई वाढू लागली असून, १२७ गावे ९३० वाड्यांमध्ये १३० टॅंकरने आणि अमरावती विभागातील २७ गावे १ वाडीला २३ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे.  

साेमवारपर्यंत (ता. ३) जिल्हानिहाय पाणीटंचाई स्थिती :

जिल्हा गावे वाड्या टॅंकर
नाशिक विभाग
नाशिक ९९ २९२ १०३
धुळे १०
जळगाव ४४ २५
नगर २७० १३८१ ३३३
पुणे विभाग
पुणे २४ २९३ ४२
सातारा ५२ ३३२ ५१
सांगली ४१ २२५ २९
सोलापूर १० ८०
औरंगाबाद विभाग
अौरंगाबाद ३९४ ३२ ५१७
जालना ८४ १२०
बीड १७४ ६१ १९६
नांदेड
उस्मानाबाद
अमरावती विभाग
अमरावती
बुलडाणा २६ २५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com