पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील टंचाई हटेना

टॅंकर
टॅंकर

पुणे: राज्यात यंदा मॉन्सून हंगामात दमदार पाऊस पडला. मात्र, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील कारेडवाहू पट्ट्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे सप्टेंबर महिना उलटूनही राज्यात पाणीटंचाई काही हटण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट असल्याने तब्बल १ हजार १६८ गावे, ३ हजार ३६७ वाड्यांमधील १ हजार ३७७ टॅंकर धावत असल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. 

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात टंचाईचा विळखा कायम आहे. तर पश्चिम विदर्भातील बुलडाण्यातही एक टॅंकर सुरू आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई भासत असून, तेथे २९६ गावे, १२१ वाड्यांमध्ये ४८१ टॅंकरने पाणीपुरवठा केला जाता आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यात १५४, जालना जिल्ह्यात ९५, लातूरमध्ये ४१ आणि औरंगाबाद जिल्ह्यात ३८ टॅंकर सुरू आहेत. 

उत्तर महाराष्ट्रात टंचाई कमी झाली असली तरी, नगर जिल्ह्यातील २२४ गावे, १ हजार ७८ वाड्यांमध्ये टॅंकरच्या पाण्यावरच तहान भागात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाने सर्वाधिक ओढ दिली असून, तेथे २९१ गावे, १ हजार ५४३ वाड्यांमध्ये ३१५ टॅंकर धावात आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडूनही कोरडवाहू भागात १० गावे, ८५ वाड्यांमध्ये ११ टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे. सांगलीत ६९ गावे, ५१७ वाड्यांमध्ये ७६ टॅंकर सुरू आहेत. पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात एका टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. गतवर्षी सप्टेंबर अखेरीस राज्यातील १७० गावांमध्ये १३६ टॅंकर सुरू होते, अशी माहिती राज्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली. 

राज्यातील पाणीटंचाईची विभागनिहाय स्थिती

विभाग गावे वाड्या टॅंकर
उत्तर महाराष्ट्र २२४ १०७८ २२६
पश्चिम महाराष्ट्र ३७० २१४५ ४०२
मराठवाडा ५७३ १४४ ८०९
पश्चिम विदर्भ
महाराष्ट्र ११६८ ३३६७ १३७७

सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्हानिहाय पाणीटंचाई स्थिती 

जिल्हा गावे वाड्या टॅंकर
नगर २२४- १०७८ २२६
पुणे १० ८५ ११
सांगली ६९ ५१७ ७६
सोलापूर २९१ १५४३ ३१५
औरंगाबाद ५५ ३८
जालना ७६ १३ ९५
बीड २९६ १२१ ४८१
उस्मानाबाद १०८ १५४
लातूर ३८ ४१
बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com