Agriculture news in marathi Water scarcity in Marathwada is limited to Osmanabad district | Agrowon

मराठवाड्यातील पाणीटंचाई उस्मानाबाद जिल्ह्यापूरती मर्यादित

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 जुलै 2020

उस्मानाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाई आता केवळ उस्मानाबाद जिल्ह्यापुरती मर्यादित आहे. हे टंचाईग्रस्त गावे व टॅंकरच्या संख्येवरून स्पष्ट झाले आहे.

उस्मानाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाई आता केवळ उस्मानाबाद जिल्ह्यापुरती मर्यादित आहे. हे टंचाईग्रस्त गावे व टॅंकरच्या संख्येवरून स्पष्ट झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, २२ जून अखेरपर्यंत मराठवाड्यातील ९८ गावे व ७५ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून १४२ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता.२९ जून अखेरपर्यंत टंचाईग्रस्त गावांची संख्या घटली. २९ जून अखेरपर्यंत मराठवाड्यातील ५९ गावे व ४४ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.

टंचाईचा सामना करणाऱ्या वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकरची सोय करण्यात आली होती. सतत झालेल्या पावसामुळे आता पुन्हा एकदा टंचाईची स्थिती कमी झाली आहे. केवळ उस्मानाबाद जिल्ह्यातील बारा गावांतील ही टंचाई कायम राहिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १६ टँकरची सोय करण्यात आली आहे. 

टॅंकर व टँकर  व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी २०१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यात टँकरसाठी १६, तर टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी १८५ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील एका गावासह उमरगा तालुक्यातील २, भूममधील ३ व परंडा तालुक्यातील ६ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी उस्मानाबाद तालुक्यात एक, उमरगा तालुक्यात ५ भूम तालुक्यात ४, तर परंडा तालुक्यात ६ टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींमध्ये उस्मानाबादमधील ९९, तुळजापूर १४, उमरगा ४१, धूम १४, तर परंडा तालुक्यातील ३३ विहिरींचा समावेश आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...