मराठवाड्यातील २४१२ गावे, वाड्यांची तहान टॅंकरवर

टॅंकर
टॅंकर

औरंगाबाद : मराठवाड्यावरील पाणीसंकट भीषण होत चालले आहे. पुरेशा पाण्याअभावी ग्रामीण व शहरी भागातील लोकांचे हाल होत आहेत. आठही जिल्ह्यांतील २४१२ गाव-वाड्यांची तहान टॅंकरने भागविली जात आहे.  औरंगाबाद, बीड, जालना जिल्ह्यात पाणीटंचाई अतिभीषण रूप धारण करण्याच्या स्थितीत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ६६३ गावे व २४९ वाड्यांमध्ये पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. त्यासाठी ९८० टॅंकरची सोय करण्यात आली आहे. शिवाय जिल्ह्यातील ४७२ विहिरींचे टॅंकर व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात ५४९ गावे व २५५ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, त्यासाठी ७४७ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. ८७४ विहिरींचे टॅंकर व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील ३७६ गावे व ७८ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. ही टंचाई निवारण्यासाठी ४४६ टॅंकरची सोय करण्यात आली असून, जिल्ह्यातील ५९८ विहिरींचे पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यातील ८७ गावे व ५ वाड्यांची तहान भागविण्यासाठी ११० टॅंकरची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यात अधिग्रहित करण्यात आलेल्या ६५२ विहिरींच्या साहाय्याने टॅंकर व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातील २८ गावे व ७ वाड्यांमधील लोकांची तहान भागविण्यासाठी ३८ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यात अधिग्रहित करण्यात आलेल्या ४५९ विहिरींच्या मदतीने टॅंकर व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या पावसाळ्यात बहुतांश भागात सर्वाधिक पाऊस झालेल्या नांदेड जिल्ह्यात ४३ गावे १८ वाड्यांवर पाणीटंचाईचे संकट आहे. पाणीसंकट दूर करण्यासाठी ७३ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. शिवाय जिल्ह्यातील १०३ विहिरींचे अधिग्रहण करून या विहिरींच्या साहाय्याने टॅंकर व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठा केला जात आहे.  हिंगोली जिल्ह्यात २० गावे ८ वाड्या व परभणी जिल्ह्यात २१ गावे ५ वाड्यांना भीषण जलसंकटाला सामोर जावे लागत आहे. दोन्ही जिल्ह्यांतील पाणीटंचाईग्रस्त गावे, वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी अनुक्रमे ३४ व ४२ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. शिवाय हिंगोली जिल्ह्यात २४३ व परभणी जिल्ह्यात १८५ विहिरींचे अधिग्रहण करून टॅंकर व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठा करून पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com