agriculture news in marathi, water scarcity in marathwada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील १२८ गावांना पाणीटंचाईची झळ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद  : मराठवाड्यात पाणीटंचाईची धग हळहळू वाढत चालली आहे. औरंगाबाद, जालना व परभणी या तीन जिल्ह्यांतील १२८ गाव-वाड्यांना टंचाईची झळ बसत असून, या गाव-वाड्यांची तहान भागविण्यासाठी १६० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच पाणीपुरवठ्यासाठी २६१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

मराठवाड्यात यंदा टंचाईचे सर्वाधिक चटके औरंगाबाद जिल्ह्याला बसत आहेत. पाणीटंचाई असणाऱ्या १२८ गाव-वाड्यांमध्ये एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील १०४ गावांचा समावेश आहे. या गावांची तहान भागविण्यासाठी १३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

औरंगाबाद  : मराठवाड्यात पाणीटंचाईची धग हळहळू वाढत चालली आहे. औरंगाबाद, जालना व परभणी या तीन जिल्ह्यांतील १२८ गाव-वाड्यांना टंचाईची झळ बसत असून, या गाव-वाड्यांची तहान भागविण्यासाठी १६० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच पाणीपुरवठ्यासाठी २६१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

मराठवाड्यात यंदा टंचाईचे सर्वाधिक चटके औरंगाबाद जिल्ह्याला बसत आहेत. पाणीटंचाई असणाऱ्या १२८ गाव-वाड्यांमध्ये एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील १०४ गावांचा समावेश आहे. या गावांची तहान भागविण्यासाठी १३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यातील १३ गावांना १६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील सात गावे व दोन वाड्यांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. या गावांना ७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

परभणी जिल्ह्यातील एक गाव व एका वाडीला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गत आठवड्यात ९८ गावे आणि ३ वाड्या मिळून १०१ टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ११३ टॅंकरची सोय करण्यात आली होती.

औरंगाबाद, जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यांतील २६१ विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. अधिग्रहित विहिरींपैकी १७६ विहिरींचे अधिग्रहण टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी, तर ८५ विहिरी टॅंकरने करावयाच्या पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जालना जिल्ह्यातील भोकरदन व जाफ्राबाद, तसेच नांदेड जिल्ह्यातील नांदेड, परभणी जिल्ह्यांतील पालम तालुक्‍यात पाणीटंचाईच्या झळा बसणे सुरू झाले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक ४७ गावांना यंदा पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. त्यापाठोपाठ फुलंब्री तालुक्‍यातील २७ आणि सिल्लोड तालुक्‍यातील ११ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वैजापूर, खुल्ताबाद, कन्नड आणि औरंगाबाद या तालुक्‍यांतील काही गावांनाही फेब्रुवारीतच पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...