agriculture news in marathi With water scarcity Match for fifteen years at Warsa | Page 2 ||| Agrowon

वार्सा येथे पाणीटंचाईशी पंधरा वर्षांपासून सामना

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 मे 2021

वार्सा, जि. धुळे : धज्या आंबापाडा येथील ग्रामस्थांना तब्बल पंधरा वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

वार्सा, जि. धुळे : धज्या आंबापाडा येथील ग्रामस्थांना तब्बल पंधरा वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमार्फत या वस्तीवर टाकीचे बांधकाम झाले आहे. पण टाकीत एक थेंब सुद्धा पाणी नसते. याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही प्रश्न प्रलंबित आहे. पंधरा वर्षांनंतरही पाण्याचा प्रश्‍न सुटू शकलेला नाही. 

या परिसरात मे ते जून दरम्‍यान तीव्र पाणीटंचाई जाणवते. अक्षरशः विहिरीने तळ गाठलेला असतो. पाण्यासाठी १ ते २ किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागते. शासनामार्फत ‘घर तेथे नळ’ असे उपक्रम राबवण्यात येतात. परंतु येथील पाड्यावरील नागरिकांचा घसा कोरडाच असतो. या पाड्यावर १५ वर्षापूर्वी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींतर्फे १००० लिटर क्षमतेच्या टाकीचे बांधकाम झाले आहे. विहीर ते टाकीपर्यंत पाइपलाइन केली. पण भोंगळ कारभारामुळे टाकीत थेंबभर पाणी नाही. फक्त कागदोपत्री नोंद झाली आहे. ग्रामस्‍थांचा घसा कोरडाच आहे. 

जवळपास १० ते १५ वर्षे उलटून गेली. टाकी तर बांधली, पण त्यात पाणीच नाही. टाकीपर्यंत पाइपलाइन देखील केली. पण पाण्याचा प्रश्न राहूनच गेला. तेव्हा पासून थेंब भर पाणी नाही. हा फक्त देखावा आहे. 
- अतुल बिलकुळे, ग्रामस्‍थ, धज्या अंबापाडा, जि.धुळे.


इतर बातम्या
सोमवारपासून पावसाचा प्रभाव कमी होणार पुणे : दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने...
कृषी परिषदेत संचालक नेमण्यासाठी मुहूर्त...पुणे ः राज्याच्या कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी...
कोकणात जोरदार पाऊसपुणे : कोकणातील बहुतांशी भागांत पावसाने चांगलेच...
अमरावती विभागात कर्जवाटपात...यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना...
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘...बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील...
‘एफआरपी’चा अभ्यास सुरू पुणे ः राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या...
‘क्रॉपसॅप’ प्रकल्पात १७ पिकांचा समावेश पुणे ः राज्यात यंदा पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व...
यवतमाळमध्ये ६५ लाखांचे बोगस बीटी...यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा...
काळ्याफिती लावून किसानपुत्रांचे आंदोलनआंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या...
हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदीऔरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी...
नांदेडमध्ये खरीप पेरणी सुरूनांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी केंद्राकडून...पुणे ः पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग...
पीककर्ज व्याज सवलत योजनेस ३० जूनपर्यंत...अकोला : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधी...
पुणे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदचपुणे : ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तीन...औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात १५ जून...
जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणीजळगाव ः जिल्ह्यात कृषी केंद्रांमधील बियाणे साठा,...
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...