वाशीम जिल्ह्यात २७४ गावांत पाणीटंचाई शक्य

वाशीम जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आगामी काळात २७४ गावांतपाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ३२४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
Water scarcity possible in 274 villages in Washim district
Water scarcity possible in 274 villages in Washim district

वाशीम ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. प्रामुख्याने २७४ गावे निवडण्यात आली असून, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ३२४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यासाठी भरीव स्वरूपात निधी लागेल असे गृहीत धरण्यात आले आहे.  यंदा जिल्ह्यात जोरदार पाऊस झालेला असल्याने सर्वच प्रकल्प भरलेले होते. विहिरींच्या पातळीतही वाढ झालेली आहे. असे असले तरीही काही गावांना पाणी समस्येला सामोरे जावे लागू शकते. ही बाब लक्षात घेता संभाव्य पाणीटंचाईग्रस्त २७४ गावांसाठी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने २६७ गावांत ३०२ विहिरींचे अधिग्रहण, २२ गावांना टँकरने पाणीपुरवठा, नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती अशा बाबींचा आराखड्यात समावेश आहे. वाशीम तालुक्यातील ५८ गावांत ७८ उपाययोजना राबवल्या जातील. तर मालेगाव तालुक्यातील ४० गावांत ४७, रिसोडमधील ५१ गावांत ६३, मंगरुळपीरमध्ये ५३ गावांत ६०, मानोरा तालुक्यात ४९ गावांत ५२ आणि कारंजा तालुक्यातील २३ गावांत २४ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रामुख्‍याने डोंगराळ शिवारातील गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा दर वर्षी भेडसावत असतात. अशा गावांना टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात असतो. यंदा मुबलक पावसामुळे सध्या पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे. परंतु पुढील काळात उष्णतामान वाढल्यानंतर पाणीटंचाईची तीव्रता वाढू शकते, हे लक्षात घेता उपाययोजना तयार करण्याचे काम यंत्रणांनी पूर्णत्वास आणले आहे. येत्या काळात या आराखड्यानुसार पाणीटंचाई निवारणाची कामे केली जातील.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com