Agriculture news in Marathi Water scarcity proposal on hold in Akola | Agrowon

अकोला पाणी टंचाईच्या उपाययोजना खोळंबल्या

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 एप्रिल 2020

अकोला ः एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ग्रामीण भागात पाणीटंचाई वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने उपाययोजनांचा जो प्रस्ताव सादर केला तो सध्याच्या स्थितीत रखडला आहे. जिल्ह्यातील ३८१ गावांमध्ये पाणीटंचाईच्या ५९० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. याला मंजुरीची आवश्‍यकता आहे.

अकोला ः एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ग्रामीण भागात पाणीटंचाई वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने उपाययोजनांचा जो प्रस्ताव सादर केला तो सध्याच्या स्थितीत रखडला आहे. जिल्ह्यातील ३८१ गावांमध्ये पाणीटंचाईच्या ५९० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. याला मंजुरीची आवश्‍यकता आहे.

उन्हाळ्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई उद्भवते. ती निवारण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. परंतु सध्या ‘कोरोना’मुळे टंचाईच्या उपाययोजना जिल्हा परिषदेतून सादर करण्याची प्रक्रिया व जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजुरी देण्याची प्रक्रिया रखडली आहे. यामुळे  ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईचे चटके झेलावे लागू शकतात.उन्हाळ्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा प्रशासनाला पाणी टंचाई कृती आराखडा सादर करण्यात येताे. यावर्षी ३८१ गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाईची स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यासाठी ५९० उपाययाेजना सुद्धा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने प्रस्तावित केल्या आहेत.

संबंधित कामे हिवाळ्यात सुरू करून नागरिकांना उन्हाळ्यात पाणी पुरवठा सुरू करावा यासाठी संबंधित उपाययाेजनांना जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच मंजुरी देणे अपेक्षित असते. परंतु सध्या १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन आहे. त्यासोबतच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती सुद्धा पाच टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या उपाययोजनांना लॉकडाऊनचा फटका बसत आहे.

प्रस्तावित केलेल्या उपाययोजनांमध्ये विहीर अधिग्रहण १९० ठिकाणी, टॅंकरद्वारे पाणीपुरवठा १५ गावे, नळयोजना दुरुस्ती  ६२, तात्पुरती पूरक नळ योजना १२, हातपंप दुरुस्ती २३४, विहीर पंप दुरुस्ती ११, नवीन विंधन विहीर/कुपनलिका दुरुस्ती  ६१ यांचा समावेश आहे.


इतर ताज्या घडामोडी
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती...महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
राज्यात टोमॅटो ५०० ते २५०० रूपये...सांगलीत १ हजार ते १२५० रूपये दर सांगली  ः...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...