agriculture news in Marathi, water scarcity in sate, Maharashtra | Agrowon

राज्यात पाणीटंचाईत वाढ; ७८४ टँकर सुरू
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पुणे : उन्हाचा पारा वाढत असतानाच पाणीटंचाईने चांगलेच डोके वर काढले आहे. मराठवाडा व विदर्भात काही भागांत नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या राज्यातील २३ जिल्ह्यांतील तब्बल ७५८ गावे आणि ३३१ वाड्यांवर पाणीटंचाई सुरू असून, या ठिकाणी सुमारे ७८४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

पुणे : उन्हाचा पारा वाढत असतानाच पाणीटंचाईने चांगलेच डोके वर काढले आहे. मराठवाडा व विदर्भात काही भागांत नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या राज्यातील २३ जिल्ह्यांतील तब्बल ७५८ गावे आणि ३३१ वाड्यांवर पाणीटंचाई सुरू असून, या ठिकाणी सुमारे ७८४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

गेल्या वर्षी राज्यातील ८८६ गावे आणि २२०७ वाड्यांवर सुमारे ६६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत विचार केल्यास टँकरच्या संख्येत ११५ टँकरने वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात ही संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी भविष्यकाळात उद्भवणारी पाणीटंचाईची समस्या ओळखून आत्ताच जलयुक्तच्या कामावर भर देण्याची गरज आहे. अन्यथा, पुढील काही वर्षात पाणीटंचाईची समस्या पुन्हा उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्रात ९८ टँकरने पाणीपुरवठा
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत गेल्या पावसाळ्यात चांगल्या पाऊस झाला होता. खांदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यामुळे बहुतांशी धरणे तुडुंब भरली होती. गेल्या महिन्यापासून या भागात पाणीटंचाईने रूप धारण करण्यास सुरवात केली आहे. सध्या नाशिक विभागातील १३० गावे व आठ वाड्यांना ९० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील८ गावे व २५ वाड्यांना आठ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. नंदुरबार, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत एकही टँकर सुरू झालेले नाही.   

विदर्भात १५९ टँकरने पाणीपुरवठा
विदर्भातील अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांत पाणीटंचाईने उग्र रूप धारण करण्यास सुरवात केली आहे. गेल्या वर्षी या जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला होता. त्यामुळे पाणीटंचाई चांगलीच वाढली आहे. अमरावती विभागातील १६५ गावांमध्ये १५६ टँकरने पाणीपुरवठा नागरिकांना सुरू आहे. नागपूर विभागात चांगल्या पावसामुळे भूजल पातळी बऱ्यापैकी आहे. त्यामुळे पाणीटंचाई कमी आहे. नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात भूजल पातळी चांगली असल्याने टँकरने सुरू झालेले नाहीत. 

मराठवाड्यात सर्वाधिक पाणीटंचाई
गेल्या वर्षी मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, लातूर या जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला होता. रब्बी हंगामात भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केल्यामुळे भूजल पातळी पुन्हा खोल गेली आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. सध्या मराठवाड्यातील ३६३ गावे व ७० वाड्यांवर तब्बल ४७२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात सर्वाधिक मागणी औरंगाबाद जिल्ह्यातून आहे. औरंगाबादमधील सुमारे २६५ गावे ३२ वाड्यांवर पाणीटंचाई सुरू असून ३२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत टँकरची संख्या कमी असली तरी येत्या काही दिवसात ही संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे मागील दोन वर्षापूर्वी रेल्वेने पाणीपुरवठा केलेल्या लातूर जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्यात अजून टँकर सुरू झालेले नाहीत.

कोकणात कमी टँकर
कोकणात चालू महिन्यापासून पाणीटंचाई सुरू झाली आहे. सध्या ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू झाली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजूनही पाणीटंचाई नाही. कोकणातील ८६ गावे आणि २२८ वाड्यावर पाणीटंचाई सुरू असून ५५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, पुढील महिन्यात या संख्येत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे.   

टँकर सुरू न झालेले जिल्हे
सिंधुदुर्ग, नंदुरबार, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली. 

जिल्हानिहाय टँकरची संख्या 

ठाणे  १६
रायगड     १२
रत्नागिरी   ६ 
पालघर   २१
नाशिक   १७
  धुळे    ११
जळगाव     ५९
नगर    ३
औरंगाबाद   ३२४
सातारा    
जालना    ४९
बीड   ५
परभणी   १६
हिंगोली     ११
नांदेड  ६७
अमरावती 
अकोला     ५७
वाशीम     १४
बुलढाणा     ४२
यवतमाळ     ४१ 
नागपूर    
वर्धा    
चंद्रपूर     १ 

 
   

 

इतर अॅग्रो विशेष
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
जमीन सुपीकता जपत दर्जेदार संत्रा...दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत...
केळीत दोन हंगामात कारले पिकाचा प्रयोगजळगाव जिल्ह्यातील करंज येथील रामदास परभत पाटील...
कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी...अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात...
सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळजळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प...
राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठापुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप...
लावलेली वनवृक्षे जगवावी लागतीलनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच...
खजुराची शेती खुणावतेय विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी...
शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...