सोलापुरात पूरस्थितीसह पाणीटंचाई गंभीर

जिल्ह्यात अद्याप चारा उपलब्ध झाला नाही. शिवाय पुरेसा पाणीसाठा न झाल्याने चारा छावण्या आणि टँकर सुरू आहेत. लोकांची मागणी असेपर्यंत चारा छावण्या आणि टँकरने पाणीपुरवठा सुरूच राहील. यासाठी गरज पडल्यास शासनाला मदतीसाठी विशेष प्रस्ताव देण्यात येईल. - डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, सोलापूर
सोलापुरात पूरस्थितीसह पाणीटंचाई गंभीर
सोलापुरात पूरस्थितीसह पाणीटंचाई गंभीर

सोलापूर : पुण्यातील पावसावर उजनी धरण भरले. परिणामी, भीमा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली. तरीही जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. अनेक भागांत टंचाईची परिस्थिती कायम आहे. सध्या जिल्ह्यात २९२ चारा छावण्या आणि ४०० टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे. पूर आणि पाणीटंचाई असे विरोधाभासी संकट जिल्ह्यावर आले आहे.  

पुण्यातील धरणातून उजनी धरणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यानंतर पुढे उजनी धरणातून भीमा नदीत सुमारे दोन लाख क्युसेक, तर नीरा नदीत १ लाख क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. नदीत पाणी सोडल्याने पूरपरिस्थिती गंभीर झाली असली, तरी जिल्ह्यात अद्यापही केवळ ५० टक्केच पाऊस झाला आहे. पुरामुळे पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, मंगळवेढा या भागांतील स्थिती गंभीर आहे.

येथील पाण्याचा प्रश्‍न तूर्त सुटणार आहे. पण जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी या तालुक्यात टंचाईची परिस्थिती गंभीर आहे. आजही या भागातील शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत.  पावसाळा सुरू होऊन सव्वादोन महिने उलटले. पण आतापर्यंत केवळ २२५ मिलिमीटर एवढाच पाऊस जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यात २९२ ठिकाणी चारा छावण्या, तर ४०० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, असे विरोधाभासाचे चित्र जिल्ह्यात आहे.

जिल्ह्यात चारा व पाण्याची टंचाई वाढली आहे. जोपर्यंत चारा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत चारा छावण्या सुरूच राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com