टॅंकर
टॅंकर

पावसाअभावी राज्यातील पाणीटंचाई हटेना

पुणे : जुलै महिना संपत आला तरी जोरदार पावसाअभावी राज्यातील पाणीटंचाई हटण्याची चिन्हे दिसत नाहीत. टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टॅंकरची धावाधाव सुरूच आहे. राज्यातील ३ हजार ६५७ गावे, ९ हजार १४९ वाड्यांमधील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ४ हजार ७१६ टॅंकर धावत असल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. राज्याच्या तब्बल २३ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट कायम आहे.  मराठवाडा, पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये टंचाईचा विळखा कायम आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातील टंचाई दूर झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत टंचाई कमी होऊ लागली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून, तेथे ४७१ गावे, २७३७ वाड्यांसाठी ६९४ टॅंकर सुरू आहेत, तर मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील ५३५ गावे, ९१ वाड्यांमध्ये ६६७ टॅंकरने, बीड जिल्ह्यातील ४५० गावे, १०३ वाड्यांमध्ये ३६८ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील ३३६ गावे, १९६७ वाड्यांमध्ये ३८२ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी २३ जुलै रोजी राज्यातील १० जिल्ह्यांमधील टंचाईग्रस्त असलेल्या ४८६ गावे २६६ वाड्यांमध्ये ४५९ टॅंकरने पाणी द्यावे लागले होते. यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, उत्तर महाराष्ट्रातील नगर, नाशिक, धुळे, जळगाव, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, सांगली आणि सोलापूर, पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.  राज्यातील पाणीटंचाईची विभागनिहाय स्थिती

विभाग  गावे  वाड्या टॅंकर
कोकण   ०   ०   ० 
उत्तर महाराष्ट्र   ९००  ३४३३  ११५९
पश्चिम महाराष्ट्र  ८२१  ५३२६    १०२८
मराठवाडा   १६८५  ३९०    २२७२
पश्चिम विदर्भ    २४९  २५५
पूर्व विदर्भ  २   ० 
महाराष्ट्र ३६५७ ९१४९ ४७१६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com