agriculture news in marathi, water scaricity become low, nagar, maharashtra | Agrowon

नगरमध्ये सतरा वर्षांत पहिल्यांदाच पाणीटंचाईची तीव्रता कमी
सूर्यकांत नेटके
रविवार, 15 एप्रिल 2018

नगर ः जिल्ह्यात सध्या गेल्या सतरा वर्षांत पहिल्यांदाच पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे. गतवर्षी या काळात सुमारे ११४ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. सध्या फक्त संगमनेर तालुक्‍यात दोन दिवसांपासून चार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

नगर ः जिल्ह्यात सध्या गेल्या सतरा वर्षांत पहिल्यांदाच पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे. गतवर्षी या काळात सुमारे ११४ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. सध्या फक्त संगमनेर तालुक्‍यात दोन दिवसांपासून चार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

ऊस आणि साखर कारखान्यांचा तसेच बागायती जिल्हा अशी ओळख असलेल्या नगरमध्ये अलीकडच्या पंधरा वर्षांत ही ओळख पुसू लागली होती. उत्तरेकडील मुळा, भंडारदरा, निळवंडे या धरणांच्या पाणलोटाचा लाभ असलेल्या काही तालुक्‍यांचा अपवाद वगळला तर जवळपास आठ तालुक्‍यात टंचाई निर्माण होत आहे.
 
गेल्या दहा वर्षांत तर परिस्थिती वरचेवर गंभीर होत आहे. पारनेर, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, संगमनेर, कर्जत तालुक्‍यांसह इतर तालुक्‍यातही पिण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. गेल्या सतरा वर्षांचा विचार करता टॅंकरची संख्या सातत्याने वाढत गेली होती. मात्र, गेल्या सात वर्षांपासून तर चक्क डिसेंबरमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टॅंकरद्वारे करावा लागत होता. २००२ मध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या १३१ होती, तर २०१६ मध्ये तब्बल ८२८ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. 
 
हा जिल्ह्यातील टॅंकर संख्येचा विक्रम मानला जातो. जिल्ह्यातील पारनेर, जामखेड, नगर, संगमनेर, पाथर्डीसारख्या दुष्काळी तालुक्‍यांत तर वर्षातील पावसाळ्याचे महिने वगळता टॅंकर सुरू असायचे. यंदा मात्र आतापर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासली नाही. 
 
दोन दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्‍यातील वरवंडी, वनकुटे आणि कर्जुले पठार, पानोडी या गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी महाजन यांनी टॅंकर मागणी प्रस्तावाला मान्यता दिल्याने पहिल्यांदाच चार टॅंकर सुरू झाले. मात्र गेल्या सतरा वर्षांचा विचार करता जिल्ह्यामध्ये अजून तरी टंचाई नाही.
 
नगर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून ‘जलयुक्त’ची कामे जोरात सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील ५४३ गावांत झालेली ‘जलयुक्त’ची कामे व २०१७ मध्ये झालेला १६५ टक्के पाऊस याचा एकत्रित परिणाम म्हणून भूजलपातळीत वाढ झाली आहे. जलयुक्‍त शिवार व वृक्ष लागवडीच्या मोहिमांनी ही परिस्थिती झपाट्याने बदलली आहे.
 
त्यामुळे यंदा पहिल्यांदाच कडाक्‍याच्या उन्हाळ्यातही पाणीटंचाई निर्माण झाली नसल्याचा असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. १८ सप्टेंबर २०१७ पर्यंत संगमनेर तालुक्‍यातील पानोडी येथे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. त्यानंतर टॅंकर पूर्णतः बंद झाले.
 
 
वर्षनिहाय टॅंकरची संख्या
२००२ १३१ 
२००३ ३७७ 
२००४ ६१९
२००५ १९२ 
२००६ २२३ 
२००७ ४८ 
२००८ १२९
२००९ ८८ 
२०१० ५२
२०११ २२ 
२०१२ २८९ 
२०१३ ७०७ 
२०१४ ३६९ 
२०१५ ५२१
२०१६ ८२६
२०१७ ११४ 
२०१८ आजपर्यंत

 

 

इतर ताज्या घडामोडी
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...