पाण्याअभावीच देशांतर्गत स्थलांतरणात वाढ : राजेंद्रसिंह

पाण्याअभावीच देशांतर्गत स्थलांतरणात वाढ : राजेंद्रसिंह
पाण्याअभावीच देशांतर्गत स्थलांतरणात वाढ : राजेंद्रसिंह

कोल्हापूर : देशातील वाढते शहरीकरण हे विकासाचे लक्षण नसून ते नाइलाजास्तव होत आहे. पाण्याअभावी शेतीचे नुकसान होते. मग रोजगाराच्या आशेने ग्रामीण भागातील लोंढे शहरांकडे वळतात. पाण्याअभावी देशातील अंतर्गत स्थलांतरण वाढले असून, हा एक प्रकारे धोक्‍याचा इशारा आहे, असे निरीक्षण आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी नोंदवले. शिवाजी विद्यापीठ आणि आर्किटेक्‍ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २७) झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. व्याख्यानाच्या सुरुवातीला महापालिका आयुक्त डॉ. मललीनाथ कलशेट्टी यांनी सांडपाणी व्यवस्थापनाबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जलसंवर्धनासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते विनोद बोधनकर यांनी प्लॅस्टिकच्या पुनर्वापरासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.  या वेळी राजेंद्रसिंह राणा म्हणाले, "देशातील शहरीकरण वेगावे वाढत आहे. पण हा विकास नव्हे, पाण्याअभावी ग्रामीण भागातील शेती सपंत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात शहरात रोजगारासाठी येतात. आपल्याकडील शहरीकरण हे नियोजित नसून ते नाईलाजास्तव झाले आहे. हा धोक्‍याचा इशारा असून आत्ताच पाणी प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहिले नाही तर देशांतर्गत होणारे स्थलांतर परदेशातही होईल. आफ्रिका आणि मध्य आशियाई देशातून पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात लोक युरोपात जात आहेत. त्यामुळे जलस्रोत स्वच्छ ठेवणे, भूगर्भातील पाणी पातळी टिकवून ठेवणे आणि सर्वच क्षेत्रात पाणी बचत करणे ही त्रिसूत्री अवलंबली पाहीजे.’’ जलसंवर्धनाविषयी राजेंद्रसिंह म्हणाले, "कोल्हापूर हे पाणीदार लोकांचे शहर आहे. आम्ही मात्र देवाची नावडती लेकरे आहोत. त्यामुळे राजस्थानमध्ये ढग येतात, पण बरसत नाहीत. पण म्हणून आम्ही गप्प बसलो नाही. जलसंवर्धनशास्त्रातील परंपरा आणि आधुनिकतंत्र यांच्या समन्वयाने आम्ही तुरळक पावसाचे पाणीही साठवले. जमिनीत मुरवले. भूजल पातळी वाढवली. ९ नद्यांचे पुनर्जीवित केल्या. दहा हजार सहाशे स्केअर किलोमीटर जमीन ओलिताखाली आणली. आता तिथे शेती होते. पिके घेतली जातात. रोजगारासाठी शहरात गेलेले लोक परतले आहेत. पाण्याअभावी विस्थापीत झालेली बाराशे गावे पुन्हा वसली आहेत.’’  या वेळी कुलगुरू देवानंद शिंदे, आर्किटेक्‍ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, जलनायक अनिल कानडे, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, कुलसचिव विलास नांदिवडेकर, शैक्षणिक सल्लागार डी. आर. मोरे यांच्यासह आर्किटेक्‍ट, विद्यार्थी, पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com