सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली

पाणीसाठा
पाणीसाठा

सांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू आहेत. मात्र, या योजना सुरू असून देखील जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी मध्यम व लघुप्रकल्पात पाणी सोडले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढत आहे. सद्यःस्थितीला जिल्ह्यातील पाच मध्यम व ७९ लघुप्रकल्पात १९ टक्के पाणीसाठा उपयुक्त आहे.

जिल्ह्यातील ८४ प्रकल्पात गत महिन्यातच्या पहिल्या आठड्यात २६ टक्के पाणीसाठा उपयुक्त होता. मात्र, मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ७ टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. जिल्ह्यातील ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनचे दुसरे आवर्तन सुरू आहे. तर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पहिले आवर्तन सुरू आहे.

ज्या वेळी पाणीटंचाई सुरू झाली. त्या वेळी या योजना सुरू झाल्या आहेत. मात्र, हे पाणी केवळ मुख्य कालव्यातून पुढे जाऊन शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मिटवण्यास पाटबंधारे विभागाला यश आले आहे. परंतू जिल्ह्यातील तासगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ आणि खानापूर तालुक्‍यातील शेतकरी आणि पाणीपुरवठा संस्थांनी तलाव भरून देण्याची मागणी केली होती.

त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबात बैठकही झाली होती. त्यानुसार तलाव भरून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून लाभ क्षेत्रातील तलाव भरण्यात येणार असल्याने पाणी प्रश्‍न मिटेल या आशेवर शेतकरी आजही वाट पाहतोय. मात्र, तलाव भरून देण्याबाबत पाटबंधारे विभागाने तसदीही घेतली नाही. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन पाटबंधारे विभागाने केले नाही.

जत तालुक्‍यात सुमारे २८ तलाव आहेत. सात तलावात ३० ते ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. उर्वरित १२ तलावांत ३ टक्‍क्‍यांपासून ते २० टक्‍क्‍यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठ्याचा लाभ मिळणार आहे. तर ९ तलाव कोरडे पडले आहेत. जत तालुक्‍यात म्हैसाळ उपसा योजनेचे आवर्तन सुरू आहे. जत तालुक्‍याला या योजनेचे पाणी उशीरा मिळाले आहे. त्यामुळे तालुक्‍यातील तलाव भरून द्या, अशी मागणी होऊ लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com