agriculture news in marathi, water scaricity in khanapur, sangli, maharashtra | Agrowon

खानापूर तालुक्‍यात तीव्र पाणीटंचाई
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 एप्रिल 2018
आमच्या परिसरात अपेक्षित प्रमाणात पाऊस झाला नाही. नेहमीच पाणीटंचाई असते. मात्र, पाणीटंचाई कमी करण्यासाठी प्रशासन कोणत्याही उपयायोजना करत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- काकासो पाटील, पळशी, ता. खानापूर, जि. सांगली.
विटा, जि. सांगली  ः खानापूर तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. बारा गावांमध्ये तीव्र टंचाई आहे. आठ पैकी भांबर्डे व लेंगरे तलाव कोरडे पडले आहेत. अन्य तलावांत अजूनही पाणीसाठा आहे. टंचाई असलेल्या गावात प्रशासनातर्फे विहिरी, बोअर अधिग्रहणाचे काम सुरू आहे. भांबर्डे, लेंगरे गावांनी टॅंकरची मागणी केली आहे.
 
कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या खानापूर तालुक्‍यात गेले दोन वर्षे पाणीटंचाई भेडसावत आहे. प्रशासनाने दोन वर्षे टंचाईग्रस्त गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करून लोकांची तहान भागवली. दुष्काळी पट्टयातील गावांतून ‘टेंभू’चा कालवा गेल्याने सध्या पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे टंचाई थोडी सुसह्य आहे. परंतु खानापूर घाटमाथ्यावर अजूनही या योजनेची कामे अपुरी आहेत.
 
मध्यंतरी ‘टेंभू’च्या वितरिकेच्या निविदा मंजूर झाल्यात. वितरकांची कामे पूर्ण झाल्यास घाटमाथ्यावरील पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. परंतु सद्य:स्थितीला घाटमाथ्यावरील लोकांपुढे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे संकट उभे राहिले. घाटमाथ्यावरील सुलतानगादे, हिवरे, पळशी, मेंगाणवाडी, जखीनवाडी, पोसेवाडी, बलवडी (खा), गोरेवाडी येथे तात्पुरत्या स्वरूपात बोअर, विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. त्याचे पाणी लोकांना पिण्यासाठी पुरवले जात आहे. 
 
जोंधळखिंडी, देवनगर, सांगोले, भांबर्डे येथेही बोअर अधिग्रहण केले आहेत. या गावांसह अन्य गावांतही टंचाई तीव्र होणार आहे. बोअर, विहिरी अधिग्रहण केल्या असल्या तरी पाणीटंचाई लक्षात घेऊन टंचाईग्रस्त गावात टॅंकर सुरू करावेत, अशी मागणी आहे. 
 
हिवरे, पळशी येथे मोठ्या प्रमाणात निर्यात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. अन्य गावातही द्राक्षासह अन्य बागायत क्षेत्र जास्त आहे. शेतीलाही पाणीटंचाईने ग्रासले आहे. द्राक्ष बागायतदार टॅंकरने पाणी विकत घेऊन द्राक्षबागा व अन्य फळपिके जगवित असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...