पुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई

पाणीटंचाई
पाणीटंचाई
पुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे. सातारा, पुणे, सांगली जिल्ह्यातील १७ तालुक्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत अाहेत. यात सातारा आणि पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होत आहे. विभागातील टंचाईग्रस्त ७४ गावे २८० वाड्यावस्त्यांना ६५ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.
साताऱ्यातील खटाव, माण, कोरेगाव, पाटण, महाबळेश्‍वर, खंडाळा, जावळी, वाई आणि फलटण या नऊ तालुक्यातील ४८ गावे १२२ वाड्यांमधील सुमारे ५६ हजार लोकसंख्या, दहा हजार जनावरांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी ३९ टॅंकर सुरू आहेत. 
पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर, आंबेगाव, बारामती, खेड, दौंड, जुन्नर तालुक्यातील २१ गावे १५५ वाड्यावस्त्यांवरील सुमारे ४७ हजार लोकांची तहान भागविण्यासाठी २३ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 
सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील ५ गावे आणि एका वस्तीवरील सुमारे ७ हजार लोकसंख्येला तीन टॅंकरने पाणी दिले जात आहे. कोल्हापूरच्या दुर्गम भागातील सातशे लोकसंख्या आणि तीनशे पशुधनाला पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. यासाठी पाण्याचे दोन स्राेत अधिग्रहीत केले आहेत.विभागात एकूण ५२ विहिरी आणि बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले. 

पुणे विभागात सोमवारी (ता. २१) ५४ गावे १६६ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसत होती. शुक्रवारपर्यंत (ता. २५) टंचाईग्रस्त गावांची संख्या ७४ तर वाड्यावस्त्यांची संख्या २८० झाली आहे. टॅंकरची संख्या ४९ वरून ६५ झाली. चार दिवसांत २० गावे ११४ वाड्यावस्त्या टंचाईग्रस्त झाल्याने पाणीपुरवठ्यासाठी १६ टॅंकर सुरू करावे लागले अाहेत. यावरून वाढत्या पाणीटंचाईची स्थिती लक्षात येते.

विभागातील तालुकानिहाय टॅंकर स्थिती सातारा ः माण १०, जावळी १०, कोरेगाव ६,  खटाव ५, महाबळेश्‍वर ३, पाटण २, वाई २, खंडाळा १. पुणे ः आंबेगाव ८, भोर ३, बारामती ३, खेड ३, जुन्नर ३, पुरंदर २. सांगली ः खानापूर ३.

विभागातील पाणीटंचाईची स्थिती
जिल्हा गावे वाड्या लोकसंख्या पशुधन टॅंकर
पुणे २१ १५५ ४६७४९ २३
सातारा ४८ १२२ ५५९५६ ९९५३ ३९
सांगली ६७८२
काेल्हापूर ६७१ २९०

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com