agriculture news in marathi, water scheme become in trouble due to drought situation, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना बंद
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 जून 2019

नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम गाव पातळीवर पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनांवर झालेला आहे. जिल्ह्यात सध्या १४२८ वैयक्तिक पाणीपुरवठा योजनांपैकी तब्बल ६३६ पाणीपुरवठा योजना बंद आहेत. त्यातील ६११ पाणी योजना केवळ पाणी नसल्याने बंद आहेत. दक्षिण भागातील दुष्काळग्रस्त तालुक्यात बंद योजनांची संख्या अधिक आहे, असे नगर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले. 

नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम गाव पातळीवर पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनांवर झालेला आहे. जिल्ह्यात सध्या १४२८ वैयक्तिक पाणीपुरवठा योजनांपैकी तब्बल ६३६ पाणीपुरवठा योजना बंद आहेत. त्यातील ६११ पाणी योजना केवळ पाणी नसल्याने बंद आहेत. दक्षिण भागातील दुष्काळग्रस्त तालुक्यात बंद योजनांची संख्या अधिक आहे, असे नगर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले. 

जिल्ह्यात यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. गेल्या वर्षी पुरेसा पाऊस झालेला नसल्याने बहुतांश पिण्याच्या पाण्याचे स्रोत भरले नाहीत. त्याचा परिणाम गाव पातळीवर असलेल्या वैयक्तिक पाणी योजनांवर झाला. काही गावांत तर नोव्हेंबर- डिसेंबरमध्येच स्रोत आटल्याने पाणी योजना बंद पडल्या. त्यात फेब्रुवारीनंतर अधिक भर पडत गेली. यंदा उन्हाळ्यात मार्चमध्ये बंद पडलेल्या वैयक्तिक पाणीयोजनांची संख्या साडेचारशेच्या जवळपास होती. आता ही संख्या सुमारे ६३८  झाली आहे. त्यातील पंचवीस पाणीयोजना पाइपलाइन नादुरुस्त असल्याने बंद असल्या तरी, तब्बल ६११ वैयक्तिक पाणी योजना केवळ पाणी नसल्याने बंद आहेत.

दुष्काळाच्या सर्वाधिक झळा सोसत असलेल्या पारनेर, नगर, कर्जत, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी भागात बंद असलेल्या योजनांची संख्या अधिक आहे. ज्या गावांत नळयोजना बंद आहे, अन्य ठिकाणाहूनही पाण्याचा स्रोत बंद आहे, तेथे टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक गावांत आठ दिवसांत एकदा टॅंकरचे पाणी मिळत आहे. मात्र तब्बल पन्नास टक्के पाणी योजना पाण्याअभावी बंद पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

बंद असलेल्या तालुकानिहाय पाणी योजना : अकोले ः ८, संगमनेर ः ७८, कोपरगाव ः ८, राहाता ः ३, राहुरी ः ४, श्रीरामपूर ः ३, नेवासा ः २०, शेवगाव ः १४, पाथर्डी ः ९८, नगर ः ५२, पारनेर ९२, श्रीगोंदा ः ७५, कर्जत ः १००, जामखेड ः ८१. 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...