agriculture news in marathi, water scheme closed due to lack of rain, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यातील ४९० पाणी योजना बंद

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नगर  ः पावसाळ्याचे पुरते तीन महिने उलटले तरी अजूनही अनेक भागांत पाऊस नाही. त्याचा परिणाम आता दिसत आहे. गेल्या वर्षी बंद पडलेल्या पाणी योजनांच्या स्रोताला अजूनही पाऊस नसल्याने पाणी आलेले नाही. जिल्ह्यातील सध्या सुमारे ५३१ वैयक्तिक पाणी योजना बंद आहेत. त्यातील तब्बल ४९० पाणी योजना स्रोतांमध्ये पाणी नसल्याने बंद आहेत. ज्या भागाने सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसल्या आहेत त्या तालुक्यांतच सर्वाधिक पाणी योजना बंद असून पालकमंत्री राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यात बंद पाणी योजनांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे जामखेडमध्येच जलयुक्त शिवार अभियानातून मोठा खर्च केला गेला आहे. 

नगर  ः पावसाळ्याचे पुरते तीन महिने उलटले तरी अजूनही अनेक भागांत पाऊस नाही. त्याचा परिणाम आता दिसत आहे. गेल्या वर्षी बंद पडलेल्या पाणी योजनांच्या स्रोताला अजूनही पाऊस नसल्याने पाणी आलेले नाही. जिल्ह्यातील सध्या सुमारे ५३१ वैयक्तिक पाणी योजना बंद आहेत. त्यातील तब्बल ४९० पाणी योजना स्रोतांमध्ये पाणी नसल्याने बंद आहेत. ज्या भागाने सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसल्या आहेत त्या तालुक्यांतच सर्वाधिक पाणी योजना बंद असून पालकमंत्री राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यात बंद पाणी योजनांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे जामखेडमध्येच जलयुक्त शिवार अभियानातून मोठा खर्च केला गेला आहे. 

जिल्ह्यातील अकोल्याच्या पश्चिम भागात झालेल्या जोरदार पावसामुळे उत्तर भागात असलेले मुळा, भंडारदरा, निळवंडे धरण भरले. या भागातून मोठ्या प्रमाणात पाणी जायकवाडीला सोडण्यात आल्याने ते धरणही भरले आहे. दक्षिण भागात भीमा नदीचा पट्टा वगळता अन्य तालुक्यांत मात्र अजूनही पाणीटंचाई कायम आहे. ग्रामीण भागात गावपातळीवर पाणीपुरवठा करण्यासाठी नळयोजना आहेत. गेल्या वर्षी दुष्काळ होता, पाणी नसल्याने पाणी योजनांचे स्रोत बंद पडले होते.

पावसाळ्यात पाऊस झाल्यावर जलस्रोत चालू होतील असे वाटत होते. परंतु, अजूनही चांगला पाऊस नसल्याने स्त्रोत कोरडेच आहेत. जिल्ह्यात १४४६ वैयक्तिक पाणी पुरवठा योजना आहेत. त्यातील ५३१ योजना बंद आहेत. नऊ योजना पाइपलाइन नादुरुस्त असल्याने पाच योजनांचे पाणी दूषित असल्याने व २७ योजना कायमस्वरूपी बंद आहेत. बाकीच्या ४९० योजना केवळ स्रोताला पाणी नसल्याने बंद असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले. ज्या भागातील योजना बंद आहेत, तेथे सध्या ऐन पावसाळ्यातही पाणीटंचाई आहे. 

तालुकानिहाय बंद असलेल्या योजना ः अकोले ः ४, संगमनेर ः १०, कोपरगाव ः ०, राहाता ः ३, राहुरी ः ५, श्रीरामपुर ः २, नेवासा ः ३३, शेवगाव ः ७, पाथर्डी ः ६१, नगर ः ४७, पारनरे ः ८३, श्रीगोंदा ः ७५, कर्जत ः ९६, जामखेड ः १०२.


इतर ताज्या घडामोडी
रताळे वनस्पती गंधाद्वारे देते अन्य...एखाद्या हल्ल्याची चाहूल लागल्यास बहुतांश सजीव...
शेतमाल तारण योजनेअंतर्गत कारंजा बाजार...कारंजालाड, जि. वाशीम  ः शेतकऱ्यांचा शेतमाल...
खानदेशात कापूस दर स्थिर; खेडा खरेदीला...जळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
अधिक ओलावा असलेल्या कापसासाठी हवी...वर्धा ः कापसात ओलावा असल्यामुळे प्रक्रिया उद्योजक...
मराठवाड्यात पाच मोठे प्रकल्प तुडुंब औरंगाबाद : मराठवाड्यातील ११ पैकी पाच मोठे...
शेतमालाच्या शिवार खरेदीवर लक्ष द्या :...जळगाव  ः खानदेशात कापसापाठोपाठ केळी, कांदा व...
सोलापुरात चारा छावण्यांवर २४५ कोटी...सोलापूर ः दुष्काळामध्ये जिल्ह्यात चारा छावण्यांवर...
नाशिक : पणन मंडळाच्या केंद्रातून दुबईला...नाशिक : कसमादे पट्ट्यात सटाणा, कळवण, मालेगाव...
परभणी जिल्ह्यात ज्वारीची ८७ हजार...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गुरुवार...
कांदा व्यापाऱ्यांच्या साठा तपासणीची...नाशिक  : कांदा दराने मोठी उसळी घेतल्याने व...
सोलापूर जिल्ह्यात मदतीचे अनुदान...सोलापूर : दोन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात...
सांगली : पूरग्रस्तांसाठी १०२ कोटी...सांगली : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये...
पुणे विभागात रब्बीचा साडेसात लाख...पुणे  ः चार ते पाच दिवसांपूर्वी अनेक भागांत...
शिरुरमधील साडेसहा हजारांवर शेतकरी...पुणे  ः यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि...
सरकारच्या निर्णयाचा जिल्हा परिषदेला...नगर  ः राज्य सरकारने मागील सरकारच्या काळात...
नगर जिल्ह्यात पाऊण लाख हेक्टरवर रब्बी...नगर  ः जिल्ह्यात रब्बीत आतापर्यंत सुमारे ७५...
हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या :...औरंगाबाद  : राज्यातील गावा-गावांतील रस्ते,...
राष्ट्रवादी गुरुवारी साजरा करणार...मुंबई  ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...
राज्यातील पंचायत समिती सभापतींच्या...पुणे  : राज्यातील पंचायत समित्यांचे नवे...
सोलापुरात कांद्याच्या दरातील तेजी...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...