agriculture news in marathi, water scheme damage due to flood, satara, maharashtra | Page 2 ||| Agrowon

सातारा जिल्ह्यातील १३४ पाणीपुरवठा योजनांना महापुराचा फटका

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

कऱ्हाड, जि. सातारा ः महापुराने कृष्णा-कोयना या दोन मुख्य नद्यांसह जिल्ह्यातून वाहणाऱ्या अन्य नदीकाठच्या पाणी योजना धोक्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील पाटण, कऱ्हाड, जावळी, खंडाळा व महाबळेश्‍वर तालुक्यातील १३४ पाणी योजनांना महापुराचा फटका बसून तब्बल ४ कोटी ३ लाख ८७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूर काळात संबंधित पाच तालुक्यांतील तब्बल १ लाख २९ हजार २९३ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. नुकसानग्रस्त योजनापैकी अनेक योजना नव्याने सुरू कराव्या लागणार आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना तात्पुरत्या स्वरूपात पाणी सुरू करण्यात आले आहे.

कऱ्हाड, जि. सातारा ः महापुराने कृष्णा-कोयना या दोन मुख्य नद्यांसह जिल्ह्यातून वाहणाऱ्या अन्य नदीकाठच्या पाणी योजना धोक्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील पाटण, कऱ्हाड, जावळी, खंडाळा व महाबळेश्‍वर तालुक्यातील १३४ पाणी योजनांना महापुराचा फटका बसून तब्बल ४ कोटी ३ लाख ८७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूर काळात संबंधित पाच तालुक्यांतील तब्बल १ लाख २९ हजार २९३ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. नुकसानग्रस्त योजनापैकी अनेक योजना नव्याने सुरू कराव्या लागणार आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना तात्पुरत्या स्वरूपात पाणी सुरू करण्यात आले आहे. मात्र ते पुरेसे नसल्याने महापुराच्या संकटातून सावरत असतानाचा संबंधित गावातील ग्रामस्थांचे पुन्हा हाल सुरू होणार आहेत. 

ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी संबंधित गावातील ग्रामपंचायतींनी नदीकाठी पाणी योजना सुरू केल्या. त्यातून संबंधित गावातील पाणी योजना सुरू होत्या. मात्र ५ ते १० आॅगस्ट दरम्यान जिल्ह्यात महापुराने थैमान घातले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. महापुरामुळे अनेक घरेही बाधित झाली आहेत. त्यामुळे अनेकांना स्थलांतरित व्हावे लागले होते. महापूर ओसरल्यानंतर आता नदीकाठच तुटून गेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या पाणी योजनांना मोठे नुकसान पोचले आहे. नदीकाठच्या पाणी योजनेच्या काही मोटारी वाहून गेल्या आहेत. काही ठिकाणी जॅकवेलला धोका निर्माण झाला आहे. काही योजनांच्या वायरिंगमध्ये दोष निर्माण झाला आहे. काही ठिकाणी मोटारी खराब झाल्या आहेत, काही योजना या पूर्णतः नव्या कराव्या लागणार आहेत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

सध्या जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ८६, कऱ्हाड तालुक्यातील २१, महाबळेश्‍वर तालुक्यातील २३, खंडाळा तालुक्यातील ३ आणि जावळी तालुक्यातील एक अशा १३४ पाणी योजनांना तडाखा बसला आहे. नदीकाठच्या पाणी योजनांना महापुराचा फटका बसला आहे. त्यामुळे तब्बल १३४ योजनांचे ४ कोटींवर नुकसान झाले आहे. त्यातील काही गावांना अद्यापही पाणी मिळालेले नाही. बहुतांश गावात तात्पुरती पाण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र ती पुरेशी नाही.

शासन पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देते. संबंधित गावातील ग्रामस्थांच्या पिण्याचा पाण्याचा विचार करून महापुराचा तडाखा बसलेल्या संबंधित गावातील योजना तातडीने दुरुस्त करून त्यांचे काम मार्गी लावावे. ‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’ अशी गत होऊ नये, अशीही ग्रामस्थांची मागणी आहे.  


इतर ताज्या घडामोडी
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...