वडकी परिसरातील सात गावांत शिरले पाणी

वडकी, यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील वडकीसह परिसरात झालेल्या धुवाधार पावसामुळे नाल्यांना आलेले पुराचे पाणी इचोड, एकुर्ली, दहेगाव या गावांत शिरले.
Water seeped into seven villages in Wadaki area
Water seeped into seven villages in Wadaki area

वडकी, यवतमाळ  : राळेगाव तालुक्यातील वडकीसह परिसरात झालेल्या धुवाधार पावसामुळे नाल्यांना आलेले पुराचे पाणी इचोड, एकुर्ली, दहेगाव या गावांत शिरले. घरांसह दुकानांमध्ये हे पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पाण्याने रस्तेही वाहून गेल्याने सहा ते सात गावांचा संपर्क तुटला होता. 

वडकीसह परिसरातील इचोरा, एकुर्ली, गाडेघाट, दहेगाव आदी गावांमध्ये बुधवारी जोरदार पाऊस झाली. त्यामुळे नाल्यांना पूर आला. एकुर्ली  नाल्यातील पाणी गावातील लोकांच्या घरात शिरले. संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. मात्र, या घरांतील सदस्यांनी दुसरीकडे आसरा घेतल्याने सुखरून राहिले. बोरी, इचोड या गावातही पुराचे पाणी शिरल्याने पाच घरांची पडझड झाली.  घरांमधील सर्वच साहित्य वाहून गेले आहे. शेतीउपयोगी अवजारे, जनावरांचा चाराबंडी गोठ्यातील खतही वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गाडेघाट येथील शेतकरी परमेश्वर चवरडोल यांच्या शेतातील गोठ्यामधील ७० सिंचन ठिबक पाईप, खत व अवजारे वाहून गेली. 

वडकी येथील विजय देठे यांचे नाल्याच्या काठावरील शेतातील कपाशीचे पीकसह मातीही वाहून गेली. एकुर्ली, बोरी, इचोड, गाडेघाट, झुल्लर, वडगाव येथेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, बेघर झालेल्यांना तातडीने मदत मिळण्याची मागणी केली जात आहे.

उगवते पिके पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे वडकी परिसरातील शेतात उगवलेले कपाशी, तूर, सोयाबीन आदी पीक पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत दहेगावचे तलाठी संजय डुकरे यांनी नुकसानाची प्राथमिक माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली.  नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

कुंभा परिसरातही नुकसान 

मारेगाव तालुक्यातील कुंभा महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या सुमारे दहा गावांत धुवाधार पाऊस पडल्याने नाल्यालागत असलेल्या शेतातील पिके खरडून गेली आहेत. तब्बल चार तासांत ५५ मिमी पावसाची नोंद झाली. अनेक गावांजवळील नाल्यांना पूर आल्याने त्यांचा तालुक्याशी चार तास संपर्क तुटला होता. दरम्यान, या पावसाचा फटका बसलेल्या दहा गावांतील शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत मिळण्याची गरज आहे. तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी मारेगाव पंचायत समितीच्या कुंभा गणातील सदस्य व शिवसेना तालुकाप्रमुख संजय आवारी यांनी मारेगावचे तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com