agriculture news in marathi, Water shortage in 100 villages in central Khandesh | Page 2 ||| Agrowon

मध्य खानदेशात १०० गावांत पाणीटंचाई
टीम अॅग्रोवन
रविवार, 8 जुलै 2018

जळगाव : पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी जोरदार पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीटंचाई कायम आहे. खानदेशात (धुळे व जळगाव) सुमारे १०३ गावे टंचाईग्रस्त असून, टॅंकरची संख्याही पूर्वीएवढीच आहे.

जवळपास जिल्ह्यात सर्वाधिक ३८ टंचाईग्रस्त गावे अमळनेरात आहेत. पारोळा, पाचोरा, भडगाव येथेही टंचाई आहे. सोबतच कूपनलिकांचे पाणी कमी झाल्याने अनेक ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कमी केला आहे.

जळगाव : पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी जोरदार पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीटंचाई कायम आहे. खानदेशात (धुळे व जळगाव) सुमारे १०३ गावे टंचाईग्रस्त असून, टॅंकरची संख्याही पूर्वीएवढीच आहे.

जवळपास जिल्ह्यात सर्वाधिक ३८ टंचाईग्रस्त गावे अमळनेरात आहेत. पारोळा, पाचोरा, भडगाव येथेही टंचाई आहे. सोबतच कूपनलिकांचे पाणी कमी झाल्याने अनेक ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कमी केला आहे.

मोठ्या ग्रामपंचायती दोन दिवसाआड पिण्याचे पाणी देत आहेत. जोरदार पाऊस नसल्याने पाणीसाठ्याची स्थिती सुधारलेली नाही. जिल्ह्यातील कासोदा, नशिराबादसारख्या ग्रामपंचायतींसमोर पुरेसे पिण्याचे पाणी देण्याची अडचण आहे.

खानदेशचा मध्य भाग म्हणजेच अमळनेर, शिंदखेडा, धुळे तालुक्‍यांचा पूर्व भाग, भडगाव, पारोळा, पाचोरा तालुक्‍यांतील काही भागात पाण्याची समस्या बिकट आहे.

त्यात शिंदखेडा तालुक्‍यात समस्या अधिक आहे. धुळे तालुक्‍यातही कापडणे, न्याहळोद, लामकानी भागात हवा तसा पाऊस नसल्याने समस्या बिकट आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांमधील पाणी पातळी कमी होत आहे. अशीच स्थिती राहिली तर पुढे पाण्याचे संकट वाढून टॅंकरही वाढवावे लागतील, अशी शक्यता आहे.

जिल्हा :  पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या

जळगाव   ७३
धुळे  ३५

 

 

इतर ताज्या घडामोडी
टॅंकर, चारा छावण्यांबाबत...पुणे : जिल्ह्याच्या काही तालुक्यांत पाणी आणि...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १०१...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १०१...
मुगाची हमीभावाने खरेदी सुरू करावीपरभणी ः मुगाची आधारभूत किंमत ७ हजार ५० रुपये...
विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर थेट...जायकवाडी, जि. औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील...
तंत्रज्ञान, यांत्रिकीकरणाचे फायदे समजून...औरंगाबाद : शेतीक्षेत्रात वापरावयाचे तंत्रज्ञान व...
नगरमध्ये सव्वीस महसूल मंडळांत पन्नास...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये अजूनही पुरेसा पाऊस नाही....
शेतकऱ्यांनी गटशेतीचा पर्याय अवलंबावा :...अमरावती :‘‘गटशेती ही काळाची गरज असून; शेतकऱ्यांनी...
नाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे...नाशिक : जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या...
खानदेशात पाऊस सरासरीच्या उंबरठ्यावरजळगाव : मागील आठवडाभरापासून खानदेशात अधूनमधून...
नांदेड जिल्ह्यातील खरिपात २ हजारांवर...नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये २...
गडकिल्ले भाड्याने देण्याच्या...बुलडाणा : राज्यातील २५ गडकिल्ले लग्न समारंभासाठी...
'थेट शेतीमाल विक्रीमुळे गावाचे उत्पन्न...करमाड, जि. औरंगाबाद : थेट शेतीमाल खरेदीमुळे...
कडकनाथ कोंबडी वाटप योजनेची चौकशी करणार...पुणे : जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या...
पुणे विभागातील २४ तालुक्यांत पाणी टंचाई...पुणे : पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा,...
कांदा उत्पादकांचे मालेगावात बिऱ्हाड...नाशिक : कांदा व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप...
पोल्ट्रीधारक करणार रविवारी जंतरमंतरवर...नागपूर ः पशुखाद्यात झालेली वाढ परिणामी वाढता...
जिल्हा परिषदेने तीन वर्षांत लावलेली ३८...नगर ः शासनाचे ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे...
नाबार्डकडून शेतकरी कंपन्यांना सर्वतोपरी...सोलापूर ः शेतीमालाचे उत्पादन आणि मार्केटिंगसह...
अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांना ‘सियाम...औरंगाबाद : अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या...