agriculture news in marathi, Water shortage to Amravati division | Agrowon

अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

बुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक होरपळ सुरू झाली आहे. पाणीटंचाईमुळे जिल्ह्यात फेब्रुवारीतच हाहाकार उडू लागला आहे. विभागातील एकट्या बुलडाणा जिल्ह्यातच ६५ टँकर सुरू आहेत. गेल्या महिन्यापर्यंत या जिल्ह्यात २५ टँकर सुरू होते. फेब्रुवारी लागताच ही संख्या ४० ने वाढून ६५ झाली आहे. आणखी काही प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले असल्याची माहिती मिळाली. 

बुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक होरपळ सुरू झाली आहे. पाणीटंचाईमुळे जिल्ह्यात फेब्रुवारीतच हाहाकार उडू लागला आहे. विभागातील एकट्या बुलडाणा जिल्ह्यातच ६५ टँकर सुरू आहेत. गेल्या महिन्यापर्यंत या जिल्ह्यात २५ टँकर सुरू होते. फेब्रुवारी लागताच ही संख्या ४० ने वाढून ६५ झाली आहे. आणखी काही प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले असल्याची माहिती मिळाली. 

या हंगामात जिल्ह्यात सरासरीच्या सरासरीच्या ३० टक्के पाऊस कमी झाला. परिणामी याचे चटके बसायला सुरवात झाली. प्रकल्प कोरडे असल्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटू लागले. यामुळेच आता नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे. गेल्या १५ दिवसांत टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव वाढले आहेत. अद्याप उन्हाळा सुरू व्हायचा आहे. आगामी चार महिन्यांत नागरिकांना पाणी कोठून द्यायचे, याचाही पेच तयार होऊ लागला आहे. 
मागील वर्षी अकोला जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार उडाला. या वर्षी पाण्याची स्थिती चांगली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकही टँकर सुरू झाला नाही.

अमरावती, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातसुद्धा पाणी समस्या तितकी तीव्र नाही. विभागात सध्या बुलडाणा जिल्हाच पाणीटंचाईत आघाडीवर आहे. १३ तालुक्यांमध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी मोठ्या प्रमाणात नळयोजनांची विशेष दुरुस्ती, हातपंप दुरुस्तीची कामे, टँकरची संख्या वाढत आहे. ६५ गावांसाठी ६५ टँकर सुरू आहेत. दर आठवड्याला ही संख्या वाढत आहे.

जनावरांचेही हाल
नागरिकांचे पाण्यासाठी जसे हाल होत आहेत, तशीच बिकट समस्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची होऊ लागली आहे. जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे असल्याने येत्या काळात पाण्यासाठी भटकंतीशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांची यात मोठी ओढाताण होण्याची चिन्हे आहेत.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...