Agriculture news in marathi Water shortage in Aurangabad, Beed, Osmanabad district | Agrowon

औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात पाणीटंचाई

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 एप्रिल 2020

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील ७१ गाव व १९ वाड्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्या ठिकाणी ८३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टॅंकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी ९० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील ७१ गाव व १९ वाड्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्या ठिकाणी ८३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टॅंकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी ९० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण, वैजापूर, गंगापूर या चार तालुक्यांत पाणीटंचाई आहे. औरंगाबाद तालुक्यातील २४ गावे व १० वाड्यांमधील सर्वाधिक ५२ हजार ३१२ ग्रामस्थ टंचाईचा सामना करीत आहेत. २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आठ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. गंगापूर तालुक्यातील २१ गाव व २ वाड्यांमधील ३५ हजार ८६० ग्रामस्थांसाठी १५ टँकरची सोय करण्यात आली आहे. १२ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. पैठण तालुक्यातील एका गावातील ७४२९ पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना २ टँकरने पाणी पुरवले जात आहे. 

वैजापूर तालुक्यातील ६ गावे व एका वाडीतील ७ हजार १०० ग्रामस्थांना ६ टँकरने पाणी पुरविले जात आहे. ११ विहिरींचेही गंगापूरमध्ये अधिग्रहण करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील ११ गाव व ६ वाड्यांतील ३५ हजार २५९ ग्रामस्थांना टंचाईचे चटके बसत आहेत. १८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ४ विहिरींचे तालुक्यात अधिग्रहण करण्यात आले. आष्टी शहरात जवळपास २० हजार नागरिक टंचाईला सामना करीत आहेत. त्यासाठी १३ टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्याअंतर्गत एका गावांत १५१५ ग्रामस्थांसाठी दोन टँकरची सोय केली आहे. ७ विहिरींचे तालुक्यात अधिग्रहण करण्यात आले आहे. परंडा तालुक्यातील ६ गावांमधील ७५२२ ग्रामस्थांसाठी ६ टँकरने पाणी पुरवले जात आहे. १३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. 
 
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांमध्ये अधिग्रहित करण्यात आलेल्या ९० विहिरींपैकी ६६ विहिरींचे अधिग्रहण टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी, तर २४ विहिरींचे अधिग्रहण पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरसाठी करण्यात आले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...