agriculture news in marathi, water shortage continue due to lack of rain, pune, maharashtra | Agrowon

जोरदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई कायम
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 जून 2019

पुणे  : पूर्वमोसमी पावसाची ओढ, मॉन्सूनच्या पावसाला झालेला उशीर आणि जोरदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई कायम आहे. जिल्ह्यातील १३ पैकी १२ तालुक्यांना टंचाईच्या झळा बसत आहेत. तब्बल २१७ गावे १६४७ वाड्यांमध्ये ३३५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात सहा लाखांहून अधिक नागरिकांना आणि जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील १४ हजारांहून अधिक जनावरांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

पुणे  : पूर्वमोसमी पावसाची ओढ, मॉन्सूनच्या पावसाला झालेला उशीर आणि जोरदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई कायम आहे. जिल्ह्यातील १३ पैकी १२ तालुक्यांना टंचाईच्या झळा बसत आहेत. तब्बल २१७ गावे १६४७ वाड्यांमध्ये ३३५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात सहा लाखांहून अधिक नागरिकांना आणि जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील १४ हजारांहून अधिक जनावरांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

मॉन्सून दाखल होत असताना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात दमदार पाऊस पडला. मात्र दोन दिवसातच पुन्हा पाऊस थांबला. यातच जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अद्याप पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही, त्यामुळे धरणांतील पाणीसाठा तळाशी असल्याने चिंता वाढल्या आहेत. टंचाई कमी होण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे. बारामती तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून, तेथील ३० गावे ३५० वाड्यांना ४५ टॅंकरने तर इंदापूर तालुक्यातील ४४ गावे, २६१ वाड्यांना ६० टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहेत. मात्र मावळ तालुक्यात अद्याप एकही टॅंकर सुरू करावा लागला नाही. 

जिल्ह्यात ५० टक्के पाऊस
मॉन्सून उशिरा दाखल झाल्याने यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. १ जूनपासून पुणे जिल्ह्यात सरासरी केवळ ९ दिवस पाऊस पडला असून, सरासरी ७० मिलिमीटर म्हणजेच ५० टक्के पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. कोरडवाहू शिरूर तालुक्यात आठ दिवस पडलेल्या पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. तेथे १०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वेल्हे तालुक्यात सर्वांत कमी ३२ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीटंचाई कायम आहे.
 
 

जिल्ह्यात एक जूनपासून पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
तालुका सरासरी पडलेला टक्केवारी दिवस
हवेली १०७.४ ६४.३ ५९.९
मुळशी २३५.३ ९४.६  ४०.२  १०
भोर  १३८.९ ६३.२ ४५.५
मावळ   १८७.६ ७८.१  ४१.६  ६
वेल्हे   ४१७.२  १३४.५  ३२.२ १३
जुन्नर १००.९  ५१.२ ५०.७
खेड  १०३.४ ७२.४  ७०
आंबेगाव ११२.७ ९८.६ ८७.५
शिरूर  १०६.९ १०७.२ १००.३
बारामती ७८.५ २८.६  ३६.४
इंदापूर  ९२.२ ४१.४ ४४.९
दौंड  ८१.५   ६१.६  ७५.६
पुरंदर   ८८.७  ७०.४  ७९.४ 

 

बुधवारपर्यंत (ता.२६) तालुकानिहाय पाणीटंचाई स्थिती :
तालुका गावे वाड्या टॅंकर
आंबेगाव  २४ ७३ ३०
बारामती ३० ३५० ४५
भोर  
दौंड  २२  १५० ३३
हवेली १२ ३० १५
जुन्नर २५ १८९ २८
खेड २१  १९२ २६
मुळशी ४   ० 
पुरंदर १७  २४१ ३६
शिरूर  १२ १५३  ४४
वेल्हा ० 

 

इतर ताज्या घडामोडी
धो धो पावसात भिजत शरद पवारांचे...सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद...
सियाम कडून पूरग्रस्तांसाठी दीड कोटींचे...औरंगाबाद  : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित...
नांदुरा तालुक्यात दुधाळ जनावरांमध्ये घटनांदुरा, जि. बुलडाणा  : जिल्ह्यात दुधासाठी...
चिखली तालुक्यात पावसाची जोरदार हजेरीअकोला  ः या मोसमातील मॉन्सून परतला असला, तरी...
आर्द्रतेआड सोयाबीनची कमी दराने खरेदीधामणगावरेल्वे, अमरावती  ः हंगामातील नव्या...
कीड ओळखूनच व्यवस्थापन पद्धती वापरा : डॉ...जालना : ‘‘रासायनिक कीटकनाशकांच्या जास्त...
मागण्यांच्या पूर्ततेसाठी एचएएल...नाशिक  : नाशिककरांनी यशवंतराव चव्हाणांना...
अंतिम टप्प्यातील प्रचारामुळे सांगलीत...सांगली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या...
कोल्हापूर, सिंधुदुर्गातील काही भागांत...कोल्हापूर, सिंधुदुर्ग : गेल्या पंधरा दिवसांच्या...
बोराळे येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाकनाशिक : नांदगाव तालुक्यातील बोराळे येथील शेतकरी...
परभणी जिल्ह्यात हरभऱ्याची २ हजार ९००...परभणी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य)...
नांदेडमध्ये खरीप पिकांना पावसाचा फटका नांदेड : नांदेड जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १०...
शेती, शेतकरीप्रश्न हाताळण्यात कुचराईच...शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ज्या...
बियाणे उद्योगाच्या विकासासाठी स्थितीत...बियाणे उद्योगात आपले राज्य पूर्वीपासून अग्रेसर...
हमीभावाने कडधान्य विक्रीसाठी ऑनलाइन...जळगाव ः उडीद, मुगाची शासकीय खरेदी केंद्रांत...
ढगाळ हवामानामुळे साताऱ्यातील...सातारा  ः अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाचे...
जिल्हा बॅंकांची आर्थिक कोंडी चिंताजनकभूविकास बॅंका मृत्युशय्येवर गेल्यापासून...
प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्जमुंबई ः विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २१...
नगर जिल्ह्यात हमीभावाने शेतीमाल...नगर  ः मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने खरेदी...
शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरसकट...अंबाजोगाई, जि. बीड  : भाजपची मनोवृत्ती...