agriculture news in marathi, water shortage continue, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जुलै 2019

नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४८२ गावे आणि पावणेतीन हजार वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई कायम आहे. तेथे लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी  ६२७ टँकर सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. महिना उलटूनही  पुरेसा पाऊस नसल्याने ग्रामीण भागात टंचाईची तीव्रता कायम आहे.

नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४८२ गावे आणि पावणेतीन हजार वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई कायम आहे. तेथे लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी  ६२७ टँकर सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. महिना उलटूनही  पुरेसा पाऊस नसल्याने ग्रामीण भागात टंचाईची तीव्रता कायम आहे.

नगर जिल्ह्याने गेल्या वर्षभरात दुष्काळाच्या झळा सोसलेल्या आहेत. ग्रामीण भागात पाणीटंचाईमुळे लोकांना हाल सोसावे लागले. सगळ्या भागातील जलस्रोत आटल्याने जिल्हाभरात टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. टँकरचा आकडा तब्बल साडेआठशेच्या पुढे गेला होता. या महिनाभराच्या काळात काही प्रमाणात पाऊस झाल्यामुळे टॅंकरचा आकडा खाली आला असला, तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने अनेक भागात पाणीटंचाई तीव्र आहे.

सध्या जिल्हाभरातील ४८२ गावे आणि २७७५ वाड्यावस्त्यांना  ६२७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यात फक्त कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुक्यात एकही टॅंकर सुरू नसला, तरी अन्य तालुक्यांत पिण्याचे पाणी टॅंकरने पुरवावे लागत आहे. एक महिना उलटला तरी अजूनही पुरेसा पाऊस पडत नसल्याने पेरण्यादेखील रखडलेल्या आहेत. पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने लोक त्रस्त आहेत.
तालुकानिहाय टँकर संख्या ः संगमनेर ६१, अकोले २, राहुरी ३, नेवासा ३९, राहता १०, नगर ६३, पारनेर ११२, पाथर्डी ७५, शेवगाव ५०, जामखेड ५८, श्रीगोंदा ७२, कर्जत ८२.

इतर ताज्या घडामोडी
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...
खानदेशात कापूस पिकात मर रोग, मूळकूजजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार...
...अन् नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले...मुंबई  ः कोणताही अन्याय सहन करायचा नाही, या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी, नारळ, सुपारी... सिंधुदुर्ग  ः कुणी तीन लाख तर कुणी दोन...
राष्ट्रपतींनी घेतला सूतकताईचा अनुभववर्धा  ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
पीएच.डी.साठी गुरुवारी सामाईक प्रवेश...पुणे ः  राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील...
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-... भंडारा  ः विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस...
कोयना धरणातून ६७ टीएमसी पाण्याचा विसर्गसातारा : या महिन्याच्या सुरवातीपासून मुसळधार...
मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती विदारकऔरंगाबाद : अर्धा पावसाळा लोटला तरीही मराठवाड्यात...
बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाली १३२५...बुलडाणाः जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना...
कोकणात नुकसानभरपाईचे वेगळे निकष लावा :...रत्नागिरी : ‘‘सांगली, कोल्हापूरप्रमाणेच कोकणातील...
सिंधुदुर्गात अतिवृष्टीने महावितरणचे चार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि...
शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर...जालना : सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतांचा...
परभणी जिल्ह्यात पाण्याअभावी फळबाग...परभणी : जिल्ह्यात गतवर्षीची दुष्काळी स्थिती आणि...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावच्या पश्‍चिम भागातील प्रकल्प कोरडेचजळगाव ः खानदेशात अनेक भागांत पाऊसमान चांगले असले...
प्रौढांपेक्षा अळ्यांच्या वेगळ्या...गेल्या काही वर्षांमध्ये हानीकारक ठरणाऱ्या किडी...