agriculture news in marathi, Water shortage files pending in Khandesh | Agrowon

खानदेशात पाणीटंचाईच्या फायली रखडल्या
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

जळगाव : खानदेशात पाणीटंचाई वाढली आहे. टॅंकरची संख्या १५० पर्यंत पोचली असून, टॅंकर व इतर उपाययोजनांच्या मागणीसंबंधी अनेक ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर केले आहेत. परंतु, ते प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईत अडकल्याची स्थिती आहे. 

जळगाव : खानदेशात पाणीटंचाई वाढली आहे. टॅंकरची संख्या १५० पर्यंत पोचली असून, टॅंकर व इतर उपाययोजनांच्या मागणीसंबंधी अनेक ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर केले आहेत. परंतु, ते प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईत अडकल्याची स्थिती आहे. 

शेतकरीदेखील सध्या तलाठ्यांकडून सातबारा उतारा मिळत नसल्याने तलाठी कार्यालयात चकरा मारीत आहेत. तलाठी दुसरीकडेच निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. ते भेटत नाहीत. मोबाईलवर संपर्क केला तर प्रतिसाद देत नाहीत. अगदी असाच प्रकार ग्रामसेवक व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांबाबत घडत अाहे. सरपंचांना ते कार्यालयात भेटत नाहीत. अनेक ग्रामसेवक तर महिनाभरापासून गावातील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आलेले नाहीत. यामुळे पाणीटंचाईसह विकास कामांच्या इतर फायली मार्गी लावणे अशक्‍य झाले आहे. 

जिल्हा परिषद, तहसीलदार कार्यालयाकडे पाणीटंचाईवर उपाययोजनांबाबतच्या अनेक फायली, प्रस्ताव मागील १०दिवसांपासून रखडले आहेत. गावोगावी पाण्याचे स्रोत आटले आहेत. विहीर खोलीकरण, नव्या कूपनलिका तयार करूनही पुरेसे पाण्याचे स्रोत सापडत नसल्याची स्थिती असून, टॅंकरशिवाय पर्याय नाही. 

२०० विहिरी अधिग्रहित
धुळ्यातील शिंदखेडा व धुळे, नंदुरबार, पाचोरा, भडगाव, जामनेर, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, पारोळा, बोदवड या भागात टंचाई स्थिती बिकट बनत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी धुळे, जळगाव व नंदुरबारात सुमारे २०० विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. तसेच १२५ पेक्षा अधिक तात्पुरत्या उपाययोजना राबविल्या आहेत. परंतु पाण्याची समस्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. टॅंकर मागणीचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचा मुद्दा सरपंच, ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५...
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिपकोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या...
शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटीपरभणी : ‘‘परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे...
पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊसजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या...
‘टेंभू‘चे पाणी आटपाडीत, शेतकऱ्यांना...आटपाडी जि. सांगली :  टेंभू पंपगृहातील पंपात...
‘शेतकरी सन्मान योजने‘च्या अनुदानासाठी...कळमनुरी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत...
तीन कारखान्यावरील कारवाई अंतिम टप्प्यातसोलापूर : ‘‘सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...